भारत आणि इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे.
या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी गुरुवारी (२६ जुलै) इंग्लंडचा १३ सदस्सीय संघ जाहीर झाला होता.
या १३ सदस्सीय इंग्लंड संघात फिरकीपटू आदिल रशिदने टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत, केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर कसोटी संघात स्थान मिळवले होते.
आदिल रशिदचा इंग्लंड कसोटी संघात समावेश केल्याने इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने इंग्लंडच्या निवड समितीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.
“एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर एखाद्या गोलंदाजाला कसोटी संघात स्थान देणे मला हस्यास्पद वाटत आहे.” असे मायकेल वॉन म्हणाला होता.
So we have picked someone who cannot be arsed with 4 day cricket for the Test Team … Forget whether he is good enough or not I find this decision ridiculous … !!!
— Michael Vaughan (@MichaelVaughan) July 26, 2018
मॉयकेल वॉनच्या या वक्तव्याचा नंतर आदिल रशिदने जोरदार समाचार घेत पलटवार केला आहे.
“मी या वर्षाच्या सुरवातीला कसोटी क्रिकेट खेळणार नाही असे म्हणालो होतो. मात्र मी कधीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालो नव्हतो. जेव्हा तुमचा संघ अडचणीत असतो तेव्हा संघासाठी तुम्ही योगदान द्यायला हवे.” आदिल रशिदने मायकेल वॉनचे नाव घेता त्याच्या टिकेला उत्तर दिले.
“वाॅन भरपुर काही बोलतो. त्याला वाटत लोक आपल ऐकतात. परंतु कुणीही त्याच ऐकत नाही.”
रशिदने वाॅन हे वक्तव्य मुर्खपणाचे असून त्यामुळे फरक पडत नसल्याचेही म्हटले आहे.
आदिल रशिदने आजपर्यंत १० कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. या दहा सामन्यात रशिदने ३८ बळी मिळवले आहेत. विशेष म्हणजे रशिद या दहा पैकी सर्व सामने इंग्लंड बाहेर खेळला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्वाच्या बातम्या-
-चेंडू छेडछाड प्रकरणाचा व्हिडीओ एडिटेड असल्याचा खळबळजनक गौप्यस्पोट
-तेव्हा धोनी गांगुलीला म्हणाला होता, दादा तुम्हीच कर्णधारपद सांभाळा!






