पुणे| अजिंक्य क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित स्वर्गीय अण्णा नेवरेकर(सर) स्मृती करंडक 14 वर्षाखालील क्रिकेट करंडक स्पर्धेत साखळी फेरीत आदिनाथ क्रिकेट क्लब संघाने चंद्रोज् संघाचा पराभव करत स्पर्धेत पहिला विजय नोंदवला.
ए के क्लब, साळुंबरे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत अटीतटीच्या झालेल्या लढतीत अभिग्यान कुंडूच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर आदिनाथ क्रिकेट क्लब संघाने चंद्रोज् संघाचा 12 धावांनी पराभव करत स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. पहिल्यांदा खेळताना आदिनाथ क्रिकेट क्लब संघाने 20 षटकात 7 बाद 208 धावा केल्या. अभिग्यानने केवळ 59 चेंडूत 18 चौकार व 15 षटकारांसह 174 धावांची दमदार खेळी केली. 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चंद्रोज् संघाने उत्कृष्ट कामगिरी केली मात्र विजय मिळवू शकला नाही. गगनदिप पलाहेने 68 चेंडूत 16 चौकारांसह दमदार 112 धावा केल्या. स्वरूप तवाडरे व यश उसघारे यांच्या अचूक गोलंदाजीने चंद्रोज् संघाचा डाव 20 षटकात 8 बाद 196 धावांत रोखला. अभिग्यान कुंडू सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
आदिनाथ क्रिकेट क्लब- 20 षटकात 7 बाद 208 धावा(अभिग्यान कुंडू 174(59, 18×4, 15×6), पार्थ सोनावणे 3-5, श्रिराग पिल्ले 3-67) वि.वि चंद्रोज्- 20 षटकात 8 बाद 196 धावा(गगनदिप पलाहे 112(68, 16×4, 1×6), स्वरूप तवाडरे 2-31, यश उसघारे 1-24) सामनावीर- अभिग्यान कुंडू
आदिनाथ क्रिकेट क्लब संघाने 12 धावांनी सामना जिंकला.