कोलंबिया येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली आहे. भारताची युवा तिरंदाज आदिती स्वामी हिने कंपाऊंड प्रकारात 18 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करत विश्वविजेती होण्याचा मान मिळवला. आदिती ही महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवासी आहे.
मागील महिन्यातच देशासाठी कांस्यपदक जिंकलेल्या आदितीने या अंतिम सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ दाखवला. सुरुवातीलाच घेतलेली पाच गुणांची आघाडी तिने कायम ठेवली. तिच्याविरुद्ध खेळत असलेली अमेरिकेची ड्रेक लीन जोरदार प्रयत्न करूनही तिच्यापेक्षा सहा गुणांनी मागे राहिली. आदितीने 142-136 असा विजय संपादन केला.
भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत आठ पदके जिंकली आहेत. यामध्ये चार सुवर्णपदके, एक रौप्य पदक व तीन कांस्य पदक जिंकली आहेत.
बातमी अपडेट होत आहे
(Aditi Swami Become New U18 World Champion In Compound Archery)
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजमध्ये नेहमीच तळपते मराठमोळ्या अजिंक्यची बॅट, आतापर्यंतचा रेकॉर्ड 140 कोटी भारतीयांची मान उंचावणारा
‘बिल्कुल नाही, ऑस्ट्रेलियाला या पराभवाचा…’, इंग्लंडविरुद्ध हारताच कमिन्सचे मोठे विधान, लगेच वाचा