---Advertisement---

अबब..! मोहम्मद शमीच्या प्रेमात पडली ‘पॉर्नस्टार’? शुभेच्छा देताना लिहिलाय खास मेसेज

On: बुधवार, मार्च 30, 2022 3:48 PM
Mohammad-Shami
---Advertisement---

इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामाला (IPL 2022) २६ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या हंगामात १० संघ खेळताना दिसत आहेत. या हंगामापासून गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ आयपीएलमध्ये नव्याने सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यातही आयपीएल म्हणले की, अनेक क्षेत्रातील व्यक्ती सामन्यांबद्दल, खेळाडूंबद्दल आपापली मते व्यक्त करत असतात. त्याचप्रमाणे नुकतेच अमेरिकन पॉर्न स्टार केंड्रा लस्ट हिने यंदा गुजरात टायटन्स संघाकडून खेळणाऱ्या मोहम्मद शमी याचे कौतुक केले आहे. 

गुजरात टायटन्सचा पहिला सामना सोमवारी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध (GT vs LSG) पार पडला. या सामन्यात गुजरातने ५ विकेट्सने विजय मिळवला. गुजरातच्या या विजयात मोहम्मद शमीने (Mohammed Shami) मोलाचा वाटा उचलला होता. त्याने सामन्याच्या सुरुवातीच्याच षटकात लखनऊ संघाला मोठे धक्के दिले होते. त्याने केएल  राहुल, क्विंटॉन डी कॉक आणि मनिष पांडे या महत्त्वाच्या फलंदाजांच्या विकेट घेतल्या. त्यामुळे त्याला त्या सामन्याचा सामनावीर म्हणूनही घोषित करण्यात आले.

त्यामुळे मोहम्मद शमीवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला. यात केंड्रा लस्ट हिचाही समावेश आहे. तिने ट्वीट करून लिहिले की, ‘मोहम्मद शमीकडून अतिशय चांगले प्रदर्शन.’ तिच्या या ट्वीटनंतर अनेक सोशल मीडिया युजरकर्त्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सने ‘प्रेमात पडली आहे वाटतं’ अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. (Adult movie star Kendra Lust congratulated Gujarat Titans pacer Mohammed Shami for his performance against Lucknow Super Giants)

कोण आहे केंड्रा लस्ट?
केंड्रा लस्ट ४३ वर्षांची अमेरिकन पॉर्नस्टार आहे. तसेच ती अमेरिकेत बरीच प्रसिद्ध असून दिग्दर्शनाचेही काम करते. ती २०१२ पासून अडल्ट इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. तसेच तिने यापूर्वीही तिने सलमान खान आणि शाहरुख खान सारख्या कलाकारांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.

गुजरातने जिंकला सामना
सोमवारी झालेल्या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १५८ धावा केल्या होत्या आणि गुजरातला १५९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग गुजरातने १९.४ षटकात ५ बाद १६१ धावा करत पूर्ण केला आणि सामना ५ विकेट्सने जिंकला. या सामन्यात मोहम्मद शमीने ४ षटकांत २५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

मोठी बातमी! ऑस्ट्रेलियन महिला ९ व्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये, वेस्ट इंडिज सेमीफायनलमध्ये पराभूत

Video: विटांच्या वेगवेगळ्या रचना करताना दिसला चेन्नई संघ, धोनी-जडेजाचाही उपक्रमात सहभाग

IPL2022| बेंगलोर वि. कोलकाता सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---