रिंकू सिंग याने आयपीएलमध्ये रविवारी (10 एप्रिल) धमाकेदार खेळी करत केकेआरला विजय मिळवून दिला. गुजरात टायन्सविरुद्धच्या या सामन्यात शेवटच्या पाच चेंडूवर पाच षटकार रिंकूने मारला आणि सामना जिंकला. यावेळी गोलंदाजी करणाऱ्या यश दयाल याच्यासाठी हे षटक एखाद्या वाईट स्वप्नासारखे ठरले. अशात भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू इरफान पठाण याने यश यादलला धीर देण्यासाठी खास पोस्ट केली आहे.
गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (GT vs KKR) संघ रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमने सामने आले होते. हा सामना गुजरात टायटन्स सहज जिंकणार, असे वाटत अशतानाच रिंकू सिंग (Rinku Singh) याने आपली ताकद दाखवून दिली. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने विजय शंकर याच्या ताबडतोड अर्धशतकाच्या जोरावर 4 बाद 204 धावा कुटल्या. प्रत्युत्तरत केकेआरने 7 विकेट्सच्या नुकसानावर डावातील शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. रिंकू सिंग त्याच्या अविश्वसनीय प्रदर्शनाच्या जोरावर रातोरात स्टार बनला.
रिंकूने 21 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. शेवटच्या पाच चेंडूंवर त्याने सलग पाच षटकार ठोकले आणि संघाला आवश्यक असलेल्या 28 धावा साकारल्या. दुसरीकडे शेवटच्या षटकात गोलंदाजी करणारा युवा यश यदाय (Yash Dayal) मात्र पूर्णपणे निराश झाल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे रिंकूचे सर्वत्र कौतुक होत असताना यशला धीर देण्याची जबाबादीर माजी दिग्गज इरफान पाठाण (Irfan Pathan) याने उचलली. इरफानने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट केली की, “मैदानातील चांगले दिवस आपण मागे सोडून पुढे जातो, त्याच पद्धतीने आजचा दिवस देखील विसरून जा. तू भंबीर असशील, तर गोष्टी पुन्हा बदलू शकतात.”
दरम्यान, यशने या सामन्यात टाकलेल्या चार षटकांमध्ये 69 धावा खर्च करून एकही विकेट घेऊ शकला नाही. आयपीएल इतिहासात आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये सर्वाधिक धावा खर्च करणाऱ्यांच्या यादीत यशचे नाव दुसऱ्या क्रमांकावर जोडले गेले आहे. यादीत पहिला क्रमांक बेसिल थम्पी याचा आहे, ज्याने 4 षटकांमध्ये 70 धावा खर्च केल्या होत्या. (Advice from Irfan Pathan to Yash Dayal, social media post goes viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये धमाका करणारे सात भारतीय फलंदाज, मागचा संपूर्ण आठवडा यांच्याच नावावर
पंजाबला नमवत सनरायझर्सने खोलले विजयाचे खाते! मार्कंडे-त्रिपाठी ठरले नायक