आशिया खंडातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेला २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) सुरुवात होत आहे. भारतीय संघ या स्पर्धेत गतविजेता म्हणून सहभागी होणार आहे. मागील वर्षी शानदार कामगिरी केलेल्या अफगाणिस्तान संघाने या स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. अनुभवी अष्टपैलू मोहम्मद नबीकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. अफगाणिस्तान आपल्या आशिया चषक अभियानाची सुरुवात सलामीच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध करेल.
ACB Name Squad for Asia Cup 2022
Kabul, 16 August 2022: Afghanistan Cricket Board today announced its 17-member squad for the ACC Men's T20 Asia Cup 2022, which will be played from 27th August to 11th September in the United Arab Emirates.
Read More: https://t.co/0Py8GqhiK4 pic.twitter.com/B5bK9tn2R4
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 16, 2022
सध्या आयर्लंड दौऱ्यावर असलेल्या अफगाणिस्तान संघात आशिया चषकासाठी फक्त एक बदल केला गेला आहे. शराफुद्दीन अश्रफच्या जागी अनुभवी अष्टपैलू समीऊल्लाह शेनवारी याला संधी दिली गेली आहे. शेनवारी दोन वर्षानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन करेल. त्याने आपला अखेरचा सामना मार्च २०२० मध्ये खेळला होता. त्याच्या सोबतच १७ वर्षाचा फिरकीपटू नूर अहमद याला देखील संधी देण्यात आली आहे.
आशिया चषकामध्ये अफगाणिस्तानला ब गटात ठेवण्यात आले आहे. या गटात अफगाणिस्तानसह बांगलादेश आणि श्रीलंकेचे संघ आहेत. २७ तारखेच्या सलामीच्या सामन्यानंतर ते ३० ऑगस्टला बांगलादेशशी भिडणार आहेत. सध्या, अफगाणिस्तान आयर्लंडच्या दौऱ्यावर आहे.तेथे ते पाच सामन्यांची टी२० मालिका खेळत आहे. ही मालिका सध्या २-२ अशी बरोबरीत आहे.
आशिया चषकासाठी अफगाणिस्तान संघ-
मोहम्मद नबी (कर्णधार), नजीबुल्लाह झादरन, अजमतुल्ला ओमरझाई, अफसर झझाई, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, हशमतुल्ला शाहिदी, हजरतुल्लाह जझाई, इब्राहिम झादरन, करीम जनात, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, नजीबुल्लाह अहमद झादरान, नजीब झादरान, नजीबुल्लाह फरीद अहमद मलिक, अशमतुल्ला शाहिदी, समीऊल्लाह शेनवारी, रशीद खान.
रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी लोटला जनसागर, व्हिडिओ होतोयं भन्नाट व्हायरल
भारतीय संघाच्या कामगिरीवर कर्णधार खूष! ‘हा एक चांगला अनुभव होता’ म्हणत थोपटली पाठ
‘त्याच्यावर टीका होतेय, कारण…’ भारताच्या माजी कर्णधाराने केली पंतची पाठराखण