बांगलादेश आणि अफगानिस्तान (Afghanistan vs Bangladesh) या दोन संघांमध्ये नुकतीच एकदिवसीय मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना राशिद खानच्या शानदार गोलंदाजी आणि सलामीवीर रहमुनल्लाह गुरबाज (rahmanullah gurbaz) च्या मदतीने सोमवारी अफगाणिस्तानने ७ विकेटने जिंकला. या विजयासह अफगाणिस्तान संघ विश्वचषक सुपर लीगच्या पाॅंईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिले दोन सामने बांग्लादेशने जिंकले होते. बांगलादेशने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.
पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकल्यानंतर बांगलादेशच्या नजरा क्लीन स्वीपकडे होत्या. मात्र अनुभवी फिरकी गोलंदाज राशिदने ३७ धावा देत ३ बळी आणि मोहम्मद नबीने २९ धावा देत २ बळी घेतले. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेश संघ पहिल्यांदा फलंदाजी करत ४६.५ षटकांत १९२ धावांवर सर्वबाद झाला. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक ८६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग अफगाणिस्तानने ४०.१ षटकांमध्ये ३ विकेट गमावून केला. त्यामुळे बांगलादेशला क्लीन स्वीप होऊ दिला नाही.
आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानने चांगली सुरूवात केली. रहमतुल्लाह गुरबाज आणि रियाज हसनने पहिल्या विकेटसाठी ७९ धावा केल्या. रियाज ४९ चेडूंत ३५ धावा करून बाद झाला, त्याने ४ चौकार आणि एक षटकार मारला. दुसऱ्या विकेटसाठी रहमतुल्लाहने रहमत शाहच्या साथीने १०० धावांची भागिदारी केली आणि अफगाणिस्तानचा विजय निश्चित केला. रहमत ६७ चेंडूत ४७ धावा करुन बाद झाला, त्याने ३ चौकार मारले. गुरबाजने आपल्या शतकी खेळीत ११० चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि ४ षटकार मारले.
बांगलदेश आणि अफगानिस्तान दोन्ही संघांमध्ये ३ आणि ५ मार्च रोजी दोन टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार आहेत. गुरबाजच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने ९ सामन्यांत ५२ च्या सरासरीने ४२२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट ९१ राहिला आहे. त्याने तीन शतके झळकली आहेत. तो एक उत्तम फलंदाज मानला जातो.
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत रोहितसमोर संघनिवडीचा पेच? हे आहेत पर्याय (mahasports.in)