अफगाणिस्तान विरूद्ध झिम्बाब्वे (Afghanistan vs ZImbabwe) संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली. त्यामध्ये अफगाणिस्तानने झिम्बाब्वेचा 2-0 ने धुव्वा उडवला. तिसऱ्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानने 8 गडी राखून शानदार विजय मिळवला. या सामन्यात ‘अल्लाह गझनफर’ने (Allah Ghazanfar) धारदार गोलंदाजी केली. त्याने 5 विकेट्स घेतल्या. गझनफर हा आयपीएलमध्ये ‘मुंबई इंडियन्स’चा (Mumbai Indians) खेळाडू आहे. आयपीएल 2025च्या मेगा लिलावात मुंबईने त्याला खरेदी केले आहे. दरम्यान त्याने आता अफगाणिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका हरारे येथे खेळली गेली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. अफगाणिस्तानने दुसरा सामना 232 धावांनी जिंकला, तर त्यांनी तिसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेचा 8 गडी राखून पराभव केला.
अफगाणिस्तानचा गोलंदाज ‘अल्लाह गझनफर’ने (Allah Ghazanfar) झिम्बाब्वेविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 10 षटके टाकली. या दरम्यान केवळ 33 धावा देत 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या. कर्णधार ‘राशिद खान’ने (Rashid Khan) 8 षटकात 38 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. फरीद अहमद (Fareed Ahmad), अजमतुल्ला ओमरझाई (Azmatullah Omarzai) यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
अफगाणिस्तानने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत झिम्बाब्वेचा 2-0 ने धुव्वा उडवला. शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 127 धावा केल्या होत्या. यादरम्यान ‘शॉन विल्यम्स’ने (Shaun Williams) 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. दरम्यान त्याने 6 चौकारांसह 3 षटकार ठोकले. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 26.5 षटकांत विजय मिळवला. अफगाणिस्तानकडून ‘सेदिकुल्लाह अटल’ने (Sediqullah Atal) अर्धशतक (52 धावा) झळकावले.
🖐️🤩 pic.twitter.com/jSArBiMZOE
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) December 21, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 वर्ल्ड कपच्या विजयाने वर्ष खास बनवले, 17 वर्षांनंतर भारत विश्वविजेता ठरला
Year Ender 2024; नेमबाजी, हाॅकीपासून बुद्धिबळपर्यंत, या वर्षात खेळाडूंनी देशाची प्रतिष्ठा वाढवली
लाखो रुपयांच्या फसवणूक प्रकरणात क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाचे नाव समोर, अटक वॉरंट जारी