---Advertisement---

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकाला मिळाली धमकी!

On: गुरूवार, सप्टेंबर 1, 2022 3:34 PM
---Advertisement---

अफगाणिस्तान क्रिकेट संघाने आशिया कपमध्ये आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. श्रीलंका आणि बांगलादेशला पराभूत करून आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये पोहोचणारा अफगाणिस्तान हा पहिला संघ ठरला आहे. अफगाणिस्तान संघाच्या या कामगिरीचे बरेचसे श्रेय गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांना श्रेय जाते. कारण दोन्ही सामन्यांमध्ये संघाच्या गोलंदाजीने प्रभावी खेळ दाखवला होता. मात्र, आता त्याच्या पत्नीने त्याला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी प्रेमळ धमकी मिळाली आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज उमर गुल हा सध्या अफगाणिस्तान संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. अफगाणिस्तानने आपल्या पहिल्या दोन्ही सामन्यात विरोधी संघांना जखडून ठेवण्यात यश मिळवले.‌ श्रीलंकेला त्यांनी अवघ्या 105 धावांवर गुंडाळले होते. तर, बांगलादेशही 127 भावांच्या पुढे मजल मारू शकली नाही. संघाच्या या उत्कृष्ट कामगिरीनंतर उमर गुल याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत लिहिले होते,
‘सर्वांच्याच शानदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर आपण सुपर फोरमध्ये गेलो आहोत. या संघाचा आम्हाला अभिमान आहे. विजेते होण्यासाठी फक्त आणखी काही सामने बाकी.’

त्याच्या या ट्विटवर त्याची पत्नी मरियम नक्षने कमेंट करत लिहिले,
‘पाकिस्तान विरुद्ध हात थोडा ढिला ठेवा कोच साहेब’
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान हे संघ सुपर फोरमध्ये आमने-सामने येण्याची दाट शक्यता आहे. भारताविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तान संघ हॉंगकॉंगविरूद्ध विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. हॉंगकॉंगला पराभूत केल्यानंतर ते सुपर फोरमध्ये प्रवेश करू शकतात. सुपर फोरमध्ये दोन्ही गटातील अव्वल दोन संघ प्रत्येकी एक वेळा एकमेकांशी खेळतील. स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. हा सामना दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हाँगकाँग विरुद्ध तळपला सूर्या! कॅप्टन रोहितला मागे टाकत केली ‘या’ मोठ्या विक्रमाची नोंद
शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद.. जडेजाचा कमाल थ्रो पाहून विराटही चकित; रिऍक्शन होती पाहण्यासारखी
श्रीलंका वि. बांगलादेश संघात ‘करा वा मरा’ची लढत, जिंकणारी टीम सुपर-4 मध्ये ‘या’ संघाशी भिडणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---