अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने बुधवारी वाणिज्य शाखेच्या उपमंत्री कमीला सिद्दीकी यांची मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. याबरोबरच वाहतूक मंत्री अब्दुल हमीद तहमासी यांचीही मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.
अब्दुल हमीद तहमासी यांना अध्यक्षांच्या कायदेशीर सल्लागार डॉ अब्दुल अली मोहम्मदी यांच्या जागेवर तर कमीला सिद्दकी यांना व्यवसायीक सय्यद सलमान सदात यांच्या जागेवर नियुक्त करण्यात आले आहे.
या नियुक्तीबद्दल अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आतिफ माशाल यांनी प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली.
तसेच ते कमीला सिद्दकी यांच्याबद्दल म्हणाले, त्या क्रिकेटच्या चांगल्या समर्थक आहेत. तसेच देशातील क्रिकेटच्या प्रगतीत त्यांचे योगदान मौल्यवान ठरेल.
First Female appointed as Board Member of Afghansitan Cricket Board
Read more: https://t.co/LU1zKc1Zev— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 27, 2018
अफगाणिस्ताने नुकताच भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. या सामन्यात त्यांना दोन दिवसातच पराभव स्विकारावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–टॉप- ५: जगातील हे दिग्गज क्रिकेटपटू चष्मा घालून खेळायचे क्रिकेट!
–२०१८ रणजी स्पर्धेत खेळणार फिफा विश्वचषकापेक्षा जास्त संघ
–जगाला हेवा वाटावा असे क्रिकेट पुनरागमन स्टिव्ह स्मिथने करुन दाखवले!