अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज शफीकउल्लाह शफीकवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ६ वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. शफीकवर अफगाणिस्तान प्रीमियर लीग २०१८मध्ये नानगड लेपर्ड्स आणि २०१९मध्ये बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये सिलहेत थंडरकडून खेळताना भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांमध्ये सामील झाल्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटरपासून दूर ठेवण्यात आले आहे.
शफीकने (Shafiqullah Shafiq) आपल्यावर लावण्यात आलेल्या अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (Afghanistan Cricket Board) भ्रष्टाचार विरोधी आचारसंहितेचे उल्लंघन केलेल्या चारही आरोपांचा स्विकार केला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले की, “शफीकवर कलम २.१.१ चे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. जो मॅच फिक्सिंग किंवा इतर प्रकारे त्यामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करणे तसेच एखाद्या करारानुसार पक्षपात करण्याशी जोडला आहे. यामध्ये मुद्दाम खराब कामगिरी करण्याचाही समावेश आहे.” याव्यतिरिक्त शफीकवर कलम २.१.३चे उल्लंघन आणि इतर २ आरोप होते.
शफीकने २०१८मध्ये ८९ चेंडूत द्विशतक ठोकल्यानंतर चर्चेत आला होता. त्याने देशांतर्गत टी२० स्पर्धा नानगड चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये द्विशतक ठोकण्याचा कारनामा केला होता. त्याच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचाही विक्रम आहे.
शफीकने अफगाणिस्तानकडून २४ वनडे सामने आणि ४६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २२.६३ च्या सरासरीने ४३० धावा केल्या आहेत. तर टी२०त त्याने १६.४६ च्या सरासरीने ४९४ धावा केल्या आहेत. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना सप्टेंबर २०१९मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कूक म्हणतो, लाराच्या जवळपास पोहचु शकतो ‘हा’ भारतीय क्रिकेटपटू
-केएल राहुल म्हणतो, हा फलंदाज माझा विशेष आवडता
-केएल राहुल म्हणतो, या भारतीय गोलंदाजासाठी यष्टीरक्षण करणे महाकठीण