---Advertisement---

अफगाणिस्तानच्या प्रमुख खेळाडूचा क्रिकेटमधून तडकाफडकी ब्रेक! वर्ल्डकपआधी संघाला मोठा धक्का

On: मंगळवार, जुलै 4, 2023 11:08 AM
---Advertisement---

भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघ थेट पात्र ठरला आहे. या विश्वचषकात अफगाणिस्तान संघ दमदार कामगिरी करू शकतो अशी अपेक्षा अनेक जण व्यक्त करतायेत. असे असतानाच संघाला एक मोठा धक्का बसला असून, संघाचा प्रमुख खेळाडू असलेल्या उस्मान घनी याने काही काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने ट्विट करत म्हटले. तसेच काही काळानंतर आपण पुनरागमन करू असा शब्द देखील त्यांनी दिला.

https://twitter.com/IMUsmanGhani87/status/1675820963013771268?t=OpK2KZU5EY8l9Bq42kk87w&s=19

घनी यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे,

‘खूप विचार केल्यानंतर क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. भ्रष्ट एसीबी अधिकाऱ्यांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. त्यांच्या जागी योग्य व पात्र लोक ज्यावेळी येथील तेव्हा मी पुन्हा एकदा देशासाठी खेळण्याला प्राधान्य देईल. तोपर्यंत मी देशासाठी आतापर्यंत खेळलेल्या आठवणींचा विचार करेल.’

त्याने पुढे लिहिले,

‘अनेक वेळा प्रयत्न करूनही मी बोर्डाच्या अध्यक्षांना भेटू शकलो नाही. त्याचबरोबर निवड समितीचे अध्यक्ष देखील मला संघातून का वगळले जाते, याचे समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.’

सध्या 26 वर्षांच्या असलेल्या घनी याने 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तेव्हापासून तो केवळ 17 वनडे व 35 टी20 सामने खेळू शकला आहे. यादरम्यान त्याच्या खात्यावर अनुक्रमे 435 व 786 धावा आहेत.

(Afghanistan Cricketer Usman Ghani Took Break From International Cricket Due To Corruption In ACB)

महत्वाच्या बातम्या –
‘ते दोघे वर्ल्ड कपमध्ये भारताचे हुकमी एक्के’, दिग्गजाने यांच्यावर खेळला दाव 

“रिंकू आणि मी देशासाठी भविष्यातील फिनिशर होऊ”, आयपीएल गाजवलेल्या जितेशने व्यक्त केला विश्वास 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---