वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 16व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने आहेत. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर खेळला जात आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता खेळला जाणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी याने जिंकली आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात न्यूझीलंड संघ विजयी प्रवास सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्यासाठी अफगाणिस्तान संघात कोणताही बदल झालेला नाहीये. तसेच, दुसरीकडे न्यूझीलंड संघात एक बदल झाला आहे. नियमित कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) बाहेर पडला असून त्याच्या जागी विल यंग याला संधी मिळाली आहे.
स्पर्धेतील कामगिरी
विश्वचषक 2023 स्पर्धेतील उभय संघांची कामगिरी पाहायची झालं, तर न्यूझीलंड संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. या तिन्ही सामन्यात त्यांनी विजय साकारला आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी इंग्लंड संघाला 9 विकेट्सने पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध 99 धावांनी विजय मिळवला. तसेच, तिसऱ्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध 8 विकेट्सने विजय साकारली होता. अशात न्यूझीलंड संघ स्पर्धेतील चौथा विजय साकारण्याचा प्रयत्न करेल.
दुसरीकडे, अफगाणिस्तान संघ स्पर्धेतील पहिले दोन सामने पराभूत झाला होता. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्यांनी इंग्लंड संघाचा 69 धावांनी पराभव केला. अशात या सामन्यात विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. (Afghanistan have won the toss and have opted to field against New Zealand)
स्पर्धेच्या 16व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड
डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
अफगाणिस्तान
रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला उमरझाई, इक्रम अलखिल (यष्टीरक्षक), मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी
हेही वाचा-
वर्ल्डकपमधून मोठी बातमी! पाकिस्तानने आयसीसीकडे केली भारताची तक्रार; म्हणाला, ‘नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये…’
बिग ब्रेकिंग! 9 वर्षांनंतर मुंबई इंडियन्सपासून वेगळा झाला ‘हा’ दिग्गज, फ्रँचायझीने स्वत: दिली माहिती