अफगाणिस्तान येत्या लवकरच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळण्याची शक्यता आहे. झिम्ब्बाब्वे क्रिकेट बोर्डाबरोबर यासाठी जोरदार हालचाली अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सुरु केल्या आहेत.
या दौऱ्यात एक कसोटी, पाच एकदिवसीय सामने आणि दोन किंवा तीन टी२० सामने अफगाणिस्तान संघ खेळू शकतो. ही मालिका त्रयस्थ ठिकाणी होऊ शकते कारण सध्यस्थितीत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या क्रिकेट मालिका आयोजनासाठी तयार नाही.
२००० साली बांगलादेश संघ त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला होता. तेव्हा बांगलादेश कसोटी खेळणारा केवळ १०वा देश होता. जर अफगाणिस्तान झिम्बाब्वे कसोटी सामना खेळला तर तो ११वा देश ठरू शकतो.