Afghanistan Cricket Board: अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे तीन दिग्गज खेळाडू, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी आणि नवीन उल हक हे आता परदेशी टी20 लीगमध्ये खेळू शकणार आहेत. अफगाणिस्तान बोर्डाने आपला निर्णय मागे घेतला आहे ज्यात या तीन खेळाडूंना टी20 लीगमध्ये खेळण्यासाठी एनओसी देण्यात येणार नाही, असे म्हटले होते. तिन्ही खेळाडूंना इशारा देऊन सोडण्यात आले असून भविष्यात हे खेळाडू आधी अफगाणिस्तान संघाचे हित जपतील आणि त्यानंतरच टी20 लीग खेळण्याचा विचार करतील, असे सांगण्यात आले आहे.
अफगाणिस्तान बोर्डाच्या या निर्णयानंतर आता नवीन उल हक, मुजीब उर रहमान आणि फजल हक फारुकी जगभरातील टी20 लीगमध्ये खेळू शकतात. याशिवाय त्यांना केंद्रीय करारही मिळू शकतो. अफगाणिस्तान बोर्डाने या खेळाडूंच्या काही पगारातही कपात केली आहे आणि त्यांना अंतिम इशारा दिला आहे की, आता ते प्रथम अफगाणिस्तान संघाचा विचार करतील आणि त्यानंतरच परदेशी लीगमध्ये खेळायला जातील. (afghanistan mujeeb naveen and farooqi eligible for nocs again acb modified previously imposed sanctions)
अफगाणिस्तान बोर्डाने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे. एसीबीच्या या निवेदनात म्हटले आहे की, “या तिन्ही खेळाडूंनी अफगाणिस्तान बोर्डाचे मत मान्य केले असून आपल्या देशाकडून खेळण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. या कारणास्तव, या बदलानंतर आणि या तिन्ही खेळाडूंचे संघात महत्त्व खूप जास्त असल्याचे पाहून आम्ही त्यांच्यावर लादलेले निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.”
25 डिसेंबर रोजी अफगाणिस्तान बोर्डाने सांगितले होते की, या तीन खेळाडूंना केंद्रीय करारातून मुक्त करण्याची मागणी केली होती, जेणेकरून ते परदेशी लीगमध्ये खेळू शकतील. यानंतर, बोर्डाने निर्णय घेतला होता की, त्यांना केंद्रीय करार दिला जाणार नाही किंवा परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी एनओसीही दिली जाणार नाही. (Mujeeb, Fazal and Navin cleared to play in foreign leagues, Afghanistan board lifts ban)
हेही वाचा
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळण्याबाबत शमीचं मोठं विधान, म्हणाला, ‘मी माझ्याकडून पूर्ण…’
IND vs ENG: रोहित शर्माला घाबरला इंग्लंड संघ; डाॅन ब्रॅडमनशी केली जातेय तुलना, वाचा नक्की प्रकरण काय