आशिया चषक २०२२ चे बिगुल वाजले असून २७ ऑगस्टपासून अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होईल. संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी अफगाणिस्तानचा संघ आयर्लंडविरुद्ध ५ सामन्याची टी२० मालिका खेळत सराव करत आहे. आतापर्यंत या मालिकेतील पहिले ३ सामने पार पडले असून अखेर अफगाणिस्तानला आयर्लंडविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले आहे. अफगाणिस्तानने शुक्रवारी (१२ ऑगस्ट) झालेला तिसरा टी२० सामना २२ धावांनी जिंकला आहे.
शुक्रवारी बेलफास्ट येथे झालेल्या आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान (Ireland vs Afghanistan) संघातील तिसऱ्या टी२० सामन्यात (Third T20I) मोहम्मद नबीच्या नेतृत्त्वाखालील संघाने २० षटकात ५ विकेट्स गमावत १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ २० षटकात ९ विकेट्स गमावत १६७ धावाच करू शकला. परिणामी अफगाणिस्तानने आयर्लंड दौऱ्यातील पहिला विजय नोंदवला.
या सामन्यात अफगाणिस्तानच्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडकडून जॉर्ज डॉकरेलने चिवट झुंज दिली. त्याने ३७ चेंडू खेळताना २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ५८ धावा केल्या. परंतु त्याला कोणाची साथ मिळाली नाही. त्याला वगळता फक्त फिऑन हान्ड आणि लॉरकन टकर यांना थोडेफार योगदान देता आले. फिऑनने ३६ तर टकरने ३१ धावा केल्या. यांना वगळता आयर्लंडचे ६ फलंदाज एकेरी धावेवर बाद झाले.
Afghanistan keep series alive with a win ????
Watch the #IREvAFG T20I series LIVE on https://t.co/fm0NkfL9zU (in select regions) ???? | ???? Scorecard: https://t.co/p8bvSBs4CX
???? @ACBofficials pic.twitter.com/WX9omWB30E
— ICC (@ICC) August 12, 2022
या डावात अफगाणिस्तानकडून नवीन-उल-हकने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज हकने ४ षटकात ३ विकेट्स काढल्या. तसेच फझालहक फारुखी आणि मुजीब उर रेहमान यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानकडून रहमनुल्लाह गुरबाजने सर्वाधिक धावा फटकावल्या. त्याने ३५ चेंडूत ५३ धावा करत संघाला विजयाच्या नजीक केले. या खेळीसाठी त्याने १ षटकार आणि ८ चौकारही मारले. तसेच नजीबुल्लाह झारदान (४२ धावा), हजरतुल्लाह झझई (३९ धावा) आणि एब्राहिम झारदान (३६ धावा) यांनी चांगल्या खेळी केल्या होत्या.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या माजी स्पिनरचे मोठे विधान; म्हणतोय, टी-२० विश्वचषकात पुनरागमन नाही करू शकणार बुमराह
VIDEO। शांत अन् संयमी पुजाराचा रौद्रावतार पाहिलात का? गोलंदाजाची केलीये कडक धुलाई
सीएसकेची मालकी असलेल्या ‘या’ संघाचा मेंटॉर नाही बनू शकणार धोनी, बीसीसीआय ठरलीय कारण






