---Advertisement---

CWC 2023: पुण्यात श्रीलंकेचे पुनरागमन! अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 242 धावांचे आव्हान

On: सोमवार, ऑक्टोबर 30, 2023 5:54 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 मध्ये 30 वा सामना श्रीलंका व अफगाणिस्तान यांच्या दरम्यान खेळला जात आहे. पुणे येथील एमसीए स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केला. त्यांनी सातत्याने श्रीलंकेवर दबाव निर्माण करत श्रीलंकेचा डाव 241 धावांवर संपवला. अफगाणिस्तानसाठी वेगवान गोलंदाज फझलहक फारूखी याने सर्वाधिक चार बळी मिळवले.

प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळालेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. करूणारत्ने केवळ 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर निसंका व कर्णधार कुसल मेंडिस यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. निसंका 39 धावा करून बाद झाल्यावर मेंडिस व सदिरा समरविक्रमा यांनी पुन्हा एकदा 50 धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर त्यांचा डाव गडगडला.‌ मुजीबने दोन तर राशीदने एक गडी बाद केला. अखेर महिश थिक्षणा व ऍंजेलो मॅथ्यूज यांनी छोटेखानी खेळ्या करत संघाला 241 पर्यंत पोहोचवले.

(Afghanistan Restrict Srilanka On 241 In ODI World Cup 2023)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---