क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ म्हणून ओळखला जातो. परंतु या सभ्य खेळावर काळीमा फासणाऱ्या बऱ्याचशा घटना क्रिकेटमध्ये घडल्या आहेत. त्यापैकीच एक आहे, चेंडू छेडछाड प्रकरण (Ball Tempering). ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या सँडपेपर विवादाच्या घटनेला ४ वर्षे उटल्यानंतर आता क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा चेंडू छेडछाड प्रकरण पुढे आले आहे. मंगळवारी (२५ जानेवारी) दोहा येथे अफगाणिस्तान विरुद्ध नेदरलँड (Afghanistan vs Netherland) येथे झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान नेदरलँडचा खेळाडू चेंडूशी छेडछाड करताना दिसला आहे. यानंतर पंचांनी नेदरलँड संघाला दंड ठोठावत अफगाणिस्तानला जास्तीच्या ५ धावा भेट दिल्या (5 Penalty Runs) आहेत.
हा प्रसंग अफगाणिस्तानच्या डावातील ३१ व्या षटकादरम्यान घडला आहे. नेदरलँडचा गोलंदाज ब्रेंडन ग्लोव्हर हे षटक टाकत होता. त्याच्या या षटकातील पाचव्या चेंडूनंतर क्षेत्ररक्षक व्हीव्हीएन किंगमा चेंडूला छेडछाड करताना दिसला आहे. परंतु अद्याप हे अस्पष्ट आहे की, त्याने चेंडूला लाळ लावली होती की चेंडूची दशा बदलण्याचा प्रयत्न केला होता.
व्हिडिओ पाहा- नेमका जॉन राईट आणि सेहवाग मध्ये वाद तरी काय होता?
परंतु ही बाब त्वरितच मैदानी पंचांच्या लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी चेंडू बदलायला सांगत नवा चेंडू मागवला होता. याबरोबरच दंड म्हणून नेदरलँड्सचा विरोधी संघ अफगाणिस्तानच्या खात्यात जास्तीच्या ५ धावाही जोडल्या आहेत. पंचांच्या या निर्णयानंतर नेदरलँड्सचा कर्णधार पीटर सिलार मात्र अत्यंत निराश झाल्याचे पाहायला मिळाले आणि तो या मुद्द्यावरून पंचांशी वाद घालतानाही दिसला.
https://twitter.com/HoshangNazir/status/1485908925275082760?s=20
यापूर्वी २०१८ साली पहिल्यांदा चेंडू छेडछाड प्रकरण पुढे आले होते. त्यावेळी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊन येथे कसोटी सामना सुरू असताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड केली होती. कॅमरॉन बेनक्राफ्ट याने सँडपेपरचा वापर करत हे कृत्य केले होते. परंतु तो असे करताना कॅमेरात कैद झाल्यामुळे वादात अडकला होता. बेनक्राफ्टबरोबरच ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर आणि माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनादेखील या प्रकरणी शिक्षा झाली होती.
स्मिथ आणि वॉर्नरला चेंडू छेडछाड प्रकरणी एका वर्षासाठी क्रिकेटमधून बंदीची शिक्षा दिली गेली होती. तर बेनक्राफ्टला ९ महिन्यांसाठी निलंबित केले गेले होते. यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रतिमेवरही प्रश्न उपस्थित झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
प्रजासत्ताक दिनी ‘गोल्डन बॉय’ नीरजला दिले जाणार परम विशिष्ट सेवा मेडल, वाचा त्या पदकाबद्दल
टी२० क्रिकेटमध्ये शाकिब अल हसनचा मोठा कारनामा!! ‘असा’ पराक्रम करणारा जगातील पहिलाच
हेही पाहा-






