---Advertisement---

दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानला चिरडत अफगाणिस्तानचा जबरदस्त विजय, अंतिम सामन्यात ऋतुराजसेनेशी भिडणार

On: शुक्रवार, ऑक्टोबर 6, 2023 2:43 PM
AFG-vs-PAK
---Advertisement---

आशियाई क्रीडा स्पर्धा 2023मधील टी20 क्रिकेट स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान संघात खेळला गेला. हा सामना चीनच्या हांगझोऊ येथील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट फील्ड येथे खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळे अफगाणिस्तानने थेट अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. आता अफगाणिस्तान संघ अंतिम सामन्यात भारतीय संघाचा सामना करेल.

या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा कर्णधार गुलबदीन नईब (Gulbadin Naib) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, त्यांनी पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. यावेळी पाकिस्तान संघाचा डाव 18 षटकात 115 धावांवर संपुष्टात आला. हे आव्हान अफगाणिस्तान संघाने 17.5 षटकात 6 विकेट्स गमावत 116 धावा करून पार केले आणि 4 विकेट्सने विजय मिळवला.

अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना नूर अली जादरान याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 33 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले. त्याच्या या खेळीत 2 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. तसेच, कर्णधार गुलबदीनने नाबाद 26 धावांची विजयी खेळी साकारली. याव्यतिरिक्त अफसर झझई यानेही 13 धावांचे योगदान दिले.

यावेळी पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना अराफत मिनहास आणि उस्मान कादिर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, कासिम अक्रम आणि सुफियान मकीम यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाकडून सलामीवीर ओमेर युसूफ याने सर्वाधिक 24 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त आमेर जमालने 14, अराफत मिनहासने 13 आणि रोहेल नाझिरने 10 धावांचे योगदान दिले होते. इतर एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या पार करू शकला नाही.

यावेळी अफगाणिस्तानकडून गोलंदाजी करताना फरीद अहमद चमकला. त्याने 3 षटकात 15 धावा खर्चत सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त कैस अहमद आणि जाहिर खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, कर्णधार गुलबदीन आणि करीम जनत यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली.

आता अफगाणिस्तान संघ 7 ऑक्टोबर रोजी ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध अंतिम सामना खेळेल. या सामन्यात कोणता संघ विजयी होऊन सुवर्णपदकाचा मानकरी ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Afghanistan won by 4 wickets against pakistan in asian games 2023 2nd semi final)

हेही वाचा-
Asian Games: सेमीफायनलमध्ये ऋतुराजसेनेचा दणदणीत विजय, बांगलादेशला नमवत मिळवलं फायनलचं तिकीट
‘न्यूझीलंडने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ती…’, दारुण पराभवानंतर कर्णधार बटलरची सर्वात मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---