---Advertisement---

सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानने फोडली डरकाळी, भारतासह सर्व संघ सावध

SL-vs-AFG-3
---Advertisement---

आशिया चषक 2022ची सुरुवात अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन संघआतील लढतीने झाली. या लझतीत अफगाणिस्तान संघाने निर्विवाद वर्चस्व राखले. पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाने श्रीलंकेवर  8 विकेट्सने मात केली. आणि आशिया चषकातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवत क्वालिफायर राउंडसाठी आपला हक्क प्रस्थापित केला आहे. 

अफगाणिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्मय घेतला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्याच ओव्हरपासून आपले वर्चस्व दाखवायला सुरुवात केली. पहिल्याच ओव्हरमध्ये फजल फारुक याने दोन विकेट्स घेत श्रीलंकन संघावर दबाव बनवला. त्यानंतर मोहम्मद नबी आणि मुजीब अल रेहमान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत श्रीलंकेचा डाव केवळल 105 धावांत गुंडाळला.

त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करायला आलेल्या अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी पहिल्या चेंडूपासून हाणामारी करायला सुरुवात केली. अफागाणिस्तानचा सलामीवीर फलंदाज रेहमनुल्ला गुरबाझ याने केवळल 18 चेंडूत 40 धावा कुटल्या. शिवाय हजरदुल्ला झझाईने 38 धावा करत अफगाणिस्तानने केवळ 10.1 षटकांत लक्ष्य साध्य केले.

दरम्यान, पहिल्याच सामन्याच विजय मिळवत अफगाणिस्तान संघाने इतर सर्व संघाना सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यांच्यामुळे ब गटातील चुरस वाढली असली तरी अ गटातून वर येणाऱ्या दोन्ही संघांना देखील दबावात आणण्याचे काम अफगाणिस्तान संघाने केलं आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकात भारत दुसऱ्यांदा करणार विजेतेपदाची हॅट्रिक! ८ वर्षात नाही पाहिले पराभवाचे तोंड

पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानने दाखवला आपला दबदबा! अवघ्या 105 धावात गुंडाळला श्रीलंकेचा डाव
भारताचा स्टार अष्टपैलू आता सिनेसृष्टीत करतोय पदार्पण! चित्रपटाचा ट्रेलर पाहून सुरेश रैना झाला फॅन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---