---Advertisement---

पाच वनडेत केवळ 4 विकेट्स घेणारा गोलंदाज आयपीएल लिलावात ठरणार महागडा? कारण आहे खास

On: शुक्रवार, सप्टेंबर 27, 2024 10:31 PM
allah ghanazfar
---Advertisement---

आयपीएल लिलावात दरवर्षी फ्रँचायझी अनेक खेळाडूंवर बोली लावतात. यातील काही खेळाडूंना खूप महागडी बोली लागते आणि ते रातोरात स्टार बनतात. याशिवाय दरवर्षी काही नवीन खेळाडूंनाही संधी मिळते, ज्याद्वारे ते क्रिकेट जगतात आपली वेगळी ओळख निर्माण करतात. यंदा आयपीएल मेगा लिलावात अफगाणिस्तानचा युवा फिरकी गोलंदाज अल्लाह गझनफरची जादू पाहायला मिळू शकते.

अल्लाह गझनफरबद्दल बोलायचे झाल्यास तो, तो अफगाणिस्तान क्रिकेटमधील उगवता तारा आहे. ज्याप्रकारे राशिद खानने लहान वयात आपल्या कामगिरीने खूप चर्चा मिळवली. अल्लाह गझनफरही त्याच पावलावर पाऊल टाकत आहे. आत्तापर्यंत त्याने केवळ 5 वनडे सामने खेळले आहेत आणि केवळ 4 विकेट्स घेतल्या आहेत, परंतु त्याने ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे ते पाहता तो भविष्यात खूप चांगला गोलंदाज ठरू शकेल असे म्हणता येईल.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने 10 षटकात 2 मेडनसह 20 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. यानंतर तिसऱ्या वनडेतही त्याने 15 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 31 धावांची वेगवान खेळी केली. अल्लाह गझनफर हा खेळाडू कोणत्याही संघासाठी किती उपयुक्त ठरू शकतो हे यावरून दिसून येते.

अल्लाह गझनफर गेल्या मोसमात केकेआर संघाचा भाग होता
याआधी, अल्लाह गझनफरचे नाव आयपीएल 2024 च्या लिलावात देखील आले होते, परंतु त्याच्यावर कुणीही बोली लावली नाही. मात्र, नंतर केकेआरने त्याला बदली खेळाडू म्हणून आपल्या संघात समाविष्ट केले. त्यावेळी अल्लाह गझनफर तितका प्रसिद्ध नव्हता आणि त्यामुळेच तो आयपीएल लिलावात विकला गेला नाही. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील दमदार कामगिरीमुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्यामुळे आयपीएल लिलावात गझनफरसाठी खूप महागडी बोली लावली जाऊ शकते. आता लिलावादरम्यान त्याला कोणता संघ खरेदी करतो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा-
तीन वेळा ‘वर्ल्ड क्रिकेट अंपायर ऑफ द इयर पुरस्कार’ जिंकणाऱ्या अलीम दार यांची निवृत्तीची घोषणा

भारतीय कसोटी संघात सर्वाधिक क्रिकेटपटू कोणत्या राज्याचे आहेत?
यष्टीरक्षक पंतचा सल्ला आला कामी, बांगलादेशच्या कर्णधाराला अश्विनने असे फसवले जाळ्यात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---