Under 19 World Cup: मायदेशात 19 वर्षाखालील विश्वचषक 2024 मध्ये खेळण्यासाठी सज्ज असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला नवा कर्णधार मिळाला आहे. डेव्हिड टीगर याला हटवल्यानंतर त्याच्या जागी जुआन जेम्स याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. टीगरला इस्रायलची पोस्ट महागात पडली आणि काही दिवसांपूर्वीच त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले मात्र तो संघात कायम राहणार आहे.
जुआन जेम्स (Juan James) हा अष्टपैलू खेळाडू आहे जो उजव्या हाताने फलंदाजी करतो, तसेच ऑफ-ब्रेक गोलंदाजी करतो. सप्टेंबर 2022 मध्ये पदार्पण करणारा हा खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये नियमितपणे सक्रिय आहे आणि यापूर्वी त्याने 19 वर्षांखालील संघाचे नेतृत्व केले आहे. जुलै 2023 मध्ये बांगलादेश दौऱ्यात तो दक्षिण आफ्रिका 19 वर्षांखालील संघाकडून खेळला आणि 28.8 च्या सरासरीने पाच विकेट घेतल्या. जेम्सने मालिकेत 75 धावा केल्या होत्या. या मालिकेतील तिसऱ्या आणि पाचव्या सामन्यात त्याने संघाचे नेतृत्व केले होते.
अलीकडेच, जुआन जेम्सने दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या त्रिकोणी मालिकेतही भाग घेतला आणि त्याने तीन सामन्यांमध्ये 5 विकेट्स घेतल्या, तर त्याचा इकॉनॉमी रेट 2.89 होता, जो या मालिकेतील सर्वोत्तम होता.
आगामी विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका 19 जानेवारीला पॉचेफस्ट्रूम येथील जेबी मार्क्स ओव्हलवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याने विश्वचषकाला सुरुवात करेल. यानंतर ग्रुप स्टेजमध्ये त्यांचा सामना इंग्लंड आणि स्कॉटलंडशी होणार आहे. आयसीसीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व रद्द केल्यामुळे श्रीलंकेच्या जागी दक्षिण आफ्रिकेला या स्पर्धेचे आयोजन करण्याचा अधिकार मिळाला होता. (Africa has announced a new captain for the World Cup given the responsibility to this all-rounder)
हेही वाचा
ईशान किशनलाबद्दल थेट सीमेपलीकडून आली प्रतिक्रिया, पाकिस्तानी माजी दिग्गजाने केले मोठे विधान
विराटने नोव्हाक जोकोविचची केली स्तुती, आता दिग्गज टेनिसपटूने दिले असे उत्तर






