जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी संबंध जोडले जात आहेत. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध काही कडक ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर सहित काही लोकांचे पाकिस्तानचे मीडिया चॅनल युट्युब भारतात बंद करण्यात आले आहेत. यामध्येच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने वक्तव्य केलं आहे, जे खूप चर्चेत आहे. जाणून घ्या तो काय म्हणाला?
पहलगाम मध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 25 पर्यटकांसह 26 लोकांचा मृत्यू झाला. आधी झालेल्या काही हल्ल्यानंतर सुद्धा त्यामध्ये पाकिस्तानचा काही हात आहे का अशा चर्चा वारंवार होत असतात. हल्ल्यानंतर पाकिस्तान दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती पण भारताने जेव्हा पाकिस्तानवर कारवाई केली त्यानंतर ही संघटना त्यांच्या वक्तव्याशी पलटली आणि ते म्हणाले की, त्यांची वेबसाईट हॅक झाली होती.
या हल्ल्याविषयी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे की, जे झाले ते दुःखद आहे आणि तुम्ही लगेचच यामध्ये आमचे नाव घेतले. मुद्दा हा आहे की, हल्ला आता झाला आहे आणि तुम्ही सरळ सरळ पाकिस्तानचे नाव घेतले.
कमीत कमी तुम्ही पुरावे द्या आणि दुनियेला सांगा कुणाचाही धर्म दहशतवाद्यांना पाठिंबा देत नाही. ही माणुसकीची गोष्ट आहे, जे झालं ते दुःखद आहे. या प्रकारे गोष्टी घडायला नकोत. मी मानतो की, भारत पाकिस्तानमध्ये चांगले संबंध निर्माण व्हावेत. वादविवाद करून काहीच होणार नाही.
शाहिद आफ्रिदीचं आणखी एक वक्तव्य सोशल मीडियावर चांगलचं वायरल होत आहे. त्यामध्ये तो म्हणत आहे की, तुमची कबड्डी टीम पाकिस्तानमध्ये येते पण क्रिकेट संघ येत नाही. करायचेच असेल तर पूर्णपणे बंद करा आणि खेळायचे असेल तर पूर्णपणे खेळा.
पाकिस्तान त्यांच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून भारतात त्यांचा अजेंडा पसरवण्याचे काम करतो. यावर योग्य ती कारवाई करत भारत सरकारने काही पाकिस्तानी मीडिया चॅनल ज्यामध्ये डाऊन न्यूज, समा टीव्ही, आर्य न्यूज, जिओ न्यूज असे चैनल भारतात बंद केले आहेत. शोएब अख्तरचा सुद्धा यूट्यूब चॅनेल भारतात बॅन करण्यात आला आहे. चाहत्यांनी विनंती केली आहे की, शाहिद आफ्रिदीचा यूट्यूब चॅनेल सुद्धा बंद केला पाहिजे. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 1.22 सबस्क्राईबर्स आहेत.





