माउंट मोंगनूई| न्यूझीलंडने पाकिस्तान विरुद्ध बे ओव्हल स्टेडियमवर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत बुधवारी (३० डिसेंबर) १०१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. असे असले तरी या सामन्यातील चौथ्या डावात पाकिस्तानकडून फवाद आलमने केलेल्या शतकाचे मोठे कौतुक झाले.
या सामन्यात न्यूझीलंडने दिेलेल्या ३७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून दुसऱ्या डावात फवादने १४ चौकारांसह २६९ चेंडूत १०२ धावांची शतकी खेळी करत झुंज दिली. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील दुसरेच शतक आहे. विशेष म्हणजे त्याने पहिले शतक केल्यानंतर त्याचे दुसरे कसोटी शतक तब्बल ४१८८ दिवसांनी म्हणजेच जवळपास ११ वर्षे आणि ५ महिन्यांनी केले आहे.
त्यामुळे तो आता दोन कसोटी शतकांमध्ये सर्वाधिक दिवसांचे अंतर राहिलेल्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्यापुढे केवळ वॉरेन बार्ड्सली आणि सईद मुश्ताक अली आहेत. ऑस्ट्रेलियाच्या बार्ड्सली यांना त्यांच्या ५ व्या शतकानंतर ६ व्या शतकासाठी ५०९३ दिवस वाट पाहावी लागली होती. तर सईद मुश्ताक अली यांना पहिल्या कसोटी सामन्यानंतर दुसऱ्या कसोटी शतकासाठी ४५४४ दिवसांची वाट पाहावी लागली होती.
Fawad Alam:
1st Test hundred 👉 13 July, 2009
2nd Test hundred 👉 30 December, 2020Never give up 💪 pic.twitter.com/3Iu9pvDQ2I
— ICC (@ICC) December 30, 2020
फवादचे अविस्मरणीय पुनरागमन –
जुलै २००९ ला कसोटी पदार्पण केलेल्या फवादने पहिल्याच सामन्यात श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे १६८ धावांची शतकी केळी केली होती. त्यानंतर त्याला त्यावर्षी आणखी २ सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र नंतर खराब फॉर्ममुळे तो संघाबाहेर गेला. त्यानंतर त्याला एखाद-दोन वर्षासाठी नाही तर तब्बल ११ वर्षे पाकिस्तानच्या राष्ट्रीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली. अखेर त्याची मेहनत कामी आली आणि त्याने २००९ नंतर २०२० मध्ये पुन्हा पाकिस्तान कसोटी संघात स्थान मिळवले.
तो २०२०मध्ये इंग्लंड दौऱ्यातील १ कसोटी सामन्यात खेळला. त्यातही त्याला २१ धावाच करता आल्या. पण त्याला पुन्हा एकदा पाकिस्तानचा कर्णधार बाबार आझम खेळत नसल्याने पाकिस्तानच्या अंतिम ११ जणांच्या संघात न्यूझीलंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. यावेळी मात्र फवादने ही संधी दोन्ही हातांनी पकडली आणि कारकिर्दीतील दुसरे कसोटी शतक ठोकले.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित आला रे! भारतीय संघात हिटमॅनचे जंगी स्वागत, पहा व्हिडिओ
“काश्मीरमधील लोकांवर अत्याचार होतोय”, पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे वादग्रस्त विधान
केवळ विराट-धोनीला करता आलेला ‘तो’ विक्रम आता रविंद्र जडेजाच्याही नावावर!