इंंडियन प्रीमियर लीग २०२२मध्ये (आयपीएल) बुधवारी (२५ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात एलिमिनेटर सामना झाला. कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेल्या या थरारक सामन्यात बेंगलोरने लखनऊला १४ धावांनी पराभूत करत दुसऱ्या क्वालिफायर सामन्याचे तिकीट मिळवले आहे. यासह आरसीबीने तब्बल सात वर्षानंतर एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे.
सात वर्षानंतर आरसीबी खेळणार तो सामना
लखनऊ सुपरजायंट्सला पराभूत करत आरसीबीने २७ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये जागा मिळवली. तिसऱ्या वर्षी ते एलिमिनेटरचा अडथळा पार करू शकले. २०२० व २०२१ मध्ये त्यांनी एलिमिनेटर सामना खेळला होता. मात्र, २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्स व मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना पराभूत केले होते. यापूर्वी आरसीबीने २०१५ मध्ये अखेरच्या वेळी क्वालिफायर २ सामना खेळला होता. तेव्हा चेन्नई सुपर किंग्सने त्यांना पराभूत केले होते. त्याआधी २०११ मध्ये आरसीबीने क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सला पराभूत करत अंतिम फेरीत जागा मिळवलेली. २०१६ आयपीएलमध्ये आरसीबीने क्वालिफायर १ सामना खेळलेला. तेव्हा गुजरात लायंसला पराभूत करत त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केलेला. मात्र, अंतिम फेरीत त्यांना हार पत्करावी लागलेली.
क्वालिफायरमध्ये राजस्थानचे आव्हान
दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आरसीबीसमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान असणार आहे. राजस्थानला क्वालिफायर १ मध्ये गुजरात टायटन्सने पराभूत केले होते. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर २७ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. राजस्थान रॉयल्स २००८ नंतर प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असेल. तर आरसीबी अजूनही आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे.
दुसऱ्या क्वालिफायरसाठी आरसीबीचा संभाव्य संघ-
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शहाबाज अहमद, वनिंदू हसरंगा, जोस हेजलवूड, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या-
क्या मस्त खेला रे तू! विराटच्या नेत्रदिपक चौकाराचं गांगुली, जय शहाकडून कौतुक, रिऍक्शन कॅमेरात कैद
Eliminator | पराभवानंतर गौतमचे केएल राहुलसोबत ‘गंभीर मंथन’, अँग्री लूकचा फोटो तुफान व्हायरल
‘भविष्यात हे नाव…’, एलिमिनेटर सामन्यात शतक ठोकणाऱ्या रजत पाटीदारबद्दल विराटचं मन जिंकणारं विधान