स्टीव्ह स्मिथ या ऑस्ट्रेलियन खेळाडूची गणना जगातील दिग्गज फलंदाजांमध्ये होते. कारकीर्दीची सुरुवात फिरकीपटू म्हणून करणाऱ्या स्मिथने त्याच्या फलंदाजीने जगभरातील क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केली आहेत. मात्र, अलीकडील काळात तो खराब फॉर्मचा सामना करत आहे. विशेष म्हणजे, त्याने मागील सहा वर्षात कधीच न केलेली लाजीरवाणी कामगिरी भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत केली. काय आहे ती कामगिरी चला जाणून घेऊयात…
बुधवारी (दि. 22 मार्च) चेन्नई येथील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. स्मिथने या सामन्यात नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट 68 धावांवर पडल्यानंतर स्मिथ तिसऱ्या स्थानी खेळायला आला. यावेळी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) 13वे षटक टाकण्यासाठी आला होता. पंड्याच्या दुसऱ्या चेंडूवर स्मिथ यष्टीरक्षक केएल राहुल (KL Rahul) याच्या हातून झेलबाद झाला. यावेळी स्मिथने फक्त 3 चेंडू खेळले आणि शून्य धावेवर बाद झाला.
Hardik Pandya picks up his second wicket as Steve Smith is caught behind for a duck.
Live – https://t.co/Be8688CLXC #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/AzfPyNhxtu
— BCCI (@BCCI) March 22, 2023
यासह स्मिथच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. तब्बल 6 वर्षांनंतर स्मिथ वनडे क्रिकेटमध्ये शून्यावर बाद झाला. त्याला बाद करण्याचे काम पंड्याने केले.
स्मिथची वनडे कारकीर्द
स्टीव्ह स्मिथ याने ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत 142 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने 126 डावात फलंदाजी करताना 44.50च्या सरासरीने 4939 धावा केल्या आहेत. या धावा करताना स्मिथने 12 शतके केली आहेत. तसेच, 29 अर्धशतके झळकावली आहेत.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतही फ्लॉप
विशेष म्हणजे, स्मिथचा भारत दौरा फार चांगला राहिला नाही. त्याला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चार कसोटी सामन्यातही खास कामगिरी करता आली नाही. त्याने कसोटीच्या 7 डावात फलंदाजी करताना 29च्या सरासरीने फक्त 145 धावा केल्या. यामध्ये तो 1 वेळा शून्य धावेवर बाद झाला, तर त्याची यादरम्यानची सर्वोत्तम धावसंख्या ही 38 इतकी होती. त्यानंतर वनडे मालिकेत स्मिथने 2 डावात फक्त 22 धावा केल्या. यामध्येही तिसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला. (After 6 years Steve Smith Scored Duck in ODI format)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तीनच ओव्हरमध्ये पंड्याने केला कांगारूंचा खेळ खल्लास, हेड-स्मिथ अन् मार्शला ‘असं’ धाडलं तंबूत, वाचाच
सिराजने गमावले नंबर वनचे सिंहासन! एकही सामना न खेळता ऑसी गोलंदाज पहिल्या क्रमांकावर