---Advertisement---

सेमीफायनलमध्ये धडक मारल्यानंतर अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर चाहत्यांनी केला जल्लोष!

On: मंगळवार, जून 25, 2024 4:34 PM
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 52वा सामना अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश (AFG vs BAN) यांच्यामध्ये खेळला गेला. अर्नेस वाले या स्टेडियमवर हा सामना रंगला होता. या सामन्यात अफगाणिस्ताननं बांगलादेशला 8 धावांनी धूळ चारली आणि या विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलसाठी त्यांचं स्थान पक्कं केलं. हा सामना जिंकल्यानंतर अफगाणिस्तानच्या रस्त्यावर लोक विजयाचा आनंद साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

टी20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अफगाणिस्तान संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. हा रोमांचक सामना जिंकल्यानंतर अफगाणिस्तानच्या तंबूत सर्वत्र जल्लोषाचे वातावरण होते. तर स्टेडियममधाील अफगाणिस्तान फॅन्ससुद्धा जल्लोषाचा आनंद घेत होते. परंतु अफगाणिस्तानमधील खोस्त प्रांतातील रस्त्यावर विजयाचा जल्लोष करण्यासाठी खूप गर्दी जमली होती. तेथील सर्व लोक खूप जल्लोष करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

 

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यात अफगाणिस्ताननं टाॅस जिंकून प्रथम फलंदजीचा निर्णय घेतला आणि 5 गडी गमावून 115 धावा ठोकल्या. बांगलादेशला 116 धावांचं आव्हान दिल्यानंतर बांगलादेशनं सर्वबाद फक्त 105 धावा ठोकल्या आणि पावसानं घातलेल्या खोळंब्यानं अफगाणिस्ताननं हा सामना 8 धावांनी जिंकला. या सामन्याचा सामनावीर प्रतिभावान वेगवान गोलंदाज नवीन उल हक (Naveen-ul-Haq) ठरला.

अफगाणिस्तानसाठी नवीन उल हकनं (Naveen-ul-Haq) 4 बळी घेतले तर कर्णधार राशिद खाननं (Rashid Khan) 3 बळी घतले. अफगाणिस्तानसाठी फलंदाजी करताना सलामीवीर रहमानुल्ला गुरबाजनं (Rahmanullah Gurbaz) 55 चेंडूत सर्वाधिक 43 धावा ठोकल्या. यादरम्यान त्यानं 3 चौकार तर 1 उत्तुंग षटकार ठोकला. तर कर्णधार राशिद खाननं 10 चेंडूत 19 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत त्यानं 3 खणखणीत षटकार ठोकले.

बांगलादेशसाठी 116 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर यष्टीरक्षक लिटन दासनं (Litton Das) 49 चेंडूत नाबाद सर्वाधिक 54 धावांची खेळी खेळली. परंतु त्याला बांगलादेशच्या इतर कोणत्याही फलंदाजाकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी 8 धावांनी सामना गमावला. तर अफगाणिस्ताननं या सामन्यात वर्चस्व गाजवत सेमीफायनलमध्ये धडक मारली.

महत्त्वाच्या बातम्या-

“बंबईसे आया मेरा दोस्त…” राशिद खानची रोहित शर्मासाठी खास पोस्ट!
दुखापतीमुळे गेला लंगडत, सामना जिंकताच आला धावत! गुलबदीन नाईबचा व्हिडिओ व्हायरल
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेव्हिड वॉर्नरने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती!

  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---