---Advertisement---

रहाणेच्या निवृत्तीमुळे KKR ला धक्का! IPL 2027 च्या लिलावात नवा कर्णधार विकत घ्यावा लागेल?

On: गुरूवार, जुलै 30, 2026 3:02 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने गुरूवारी (30 जुलै) आंतरराष्ट्रीय त्याचबरोबर सर्व प्रकारच्या क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याचा हा निर्णय कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघासाठी एक मोठा धक्का ठरला आहे.

मागील हंगामात रहाणेने केकेआरचे नेतृत्व केले होते. आता त्याने निवृत्ती घेतल्याने केकेआरला आयपीएल 2027 आधी नव्या कर्णधाराचे नाव जाहीर करावे लागेल. केकेआरकडे कर्णधाराचे फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना दुसरा कर्णधार कसा मिळेल, हे जाणून घ्या.

राहणेच्या निवृत्तीमुळे केकेआरचे कर्णधारपद रिक्त झाले आहे. त्यांच्याकडे आता या पदासाठी केवळ एकच पर्याय शिल्लक आहे, रिंकू सिंग. रिंकू सध्या संघाचा उपकर्णधार आहे, मात्र त्याच्यावर विश्वास ठेवणे संघासाठी कितपत योग्य हे त्याच्या कामगिरीवरून दिसते. पहिले तर तो सध्या चांगल्या लयीत नाही. दुसरे म्हणजे तो एक फिनिशर आहे आणि खूपच कमी गोलंदाजी करतो.

तसे रिंकूला देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा अनुभव आहे, मात्र केकेआर त्याला कर्णधारपदाची जबाबदारी देणार की दुसरा पर्याय शोधणार हे लवकरच कळेल.

केकेआरकडे असलेले पर्याय
रिंकूचा पर्याय काहीसा पटत नसला, तर केकेआरला आता नव्या कर्णधारासाठी शोधाशोध करावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना 2027 च्या आयपीएल लिलावात एका अशा खेळाडूवर गुंतवणूक करावी लागेल, जो संघाचे नेतृत्व करेल. संघाची कामगिरी मागील काही हंगामांपासून निराशाजनक होत आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर ट्रेड विंडोद्वारे कर्णधारपदासाठी एक चांगला खेळाडू शोधण्याचा पर्याय आहे.

आयपीएल 2027 ट्रेड विंडोमध्ये सध्या एक नाव आघाडीवर आहे, हार्दिक पंड्या. केकेआर त्याला संघात घेण्याची शक्यता दाट आहे, मात्र त्यासाठी त्याला मुंबई इंडियन्स संघ सोडायचा असेल आणि संघ त्याला दुसऱ्या कोणासाठी ट्रेड करत असेल तरच हे शक्य आहे, कारण कोणताही खेळाडू आपोआप दुसऱ्या संघात सामील होऊ शकत नाही.

काही रिपोर्ट्सनुसार, हार्दिकला नव्या संघाचा शोध आहे. समजा त्याचा केकेआरसोबत ट्रेड झाला तर मुंबई इंडियन्सला त्याच्याबदल्यात कोणता खेळाडू हवा असेल, हे रंजक ठरेल. (after Ajinkya Rahane retirement Kolkata Knight Riders in trouble have to search new captain

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---