वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने भारताला मात दिली. इतिहिसातील सहवा वनडे विश्वचषक यावर्षी ऑस्ट्रेलियाने जिंकला. पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला होता. आता रोहितची मुलगी समायरा हिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियन संघ वनडे विश्वचषकात पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाला होता. पण नंतरच्या सलग 9 सामन्यात त्यांनी विजय मिळवला. दुसरीकडे भारताने सुरुवातीच्या 10 सामन्यात विजय मिळवला होता. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारला. पराभवानंतर रोहित शर्मा () याच्या डोळ्यांमध्ये पाणी पाहायला मिळाले. रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल जाला होता. रोहित अद्याप या पराभवाच्या सदम्यातून बाहेर आला की नाही, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
अशातच रोहितची मुलगी समायरा हिचा व्हिडिओ समोर येत आहे. व्हिडिओत समायरा म्हणते की, “तो (रोहित) त्याच्या खोलीत आहे. सध्या तो पॉजिटिव्ह आहे. एका महिन्याच्या आत तो पुन्हा हसू लागेल.” समायराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
The way she answered ????❤
Samaira said : He is in a room, he is almost positive & within one month he will laugh again.@ImRo45 pic.twitter.com/yt3iSQa6MP
— 46thcenturywhenRohit (@RohitCharan_45) November 23, 2023
हा व्हिडिओ भारताच्या पराभवानंतर व्हायरल होत असला, तरी हा व्हिडिओ आताचा नसून जुना आहे. कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत असताना रोहित शर्मा यालाही कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा समायराने रोहितच्या फिटनेसबाबत ही माहिती दिली होती. आता हाच व्हिडिओ चाहत्यांनी पुन्हा व्हायरल केला आहे. 2023 विश्वचषकातील पराभवासोबत हा व्हिडिओ जोडला जात आहे.
दरम्यान, वनडे विश्वचषक संपल्यानंतर पुढच्या वर्षी भारताला टी-20 विश्वचषक खेळायचा आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी मागच्या एका वर्षात एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. वनडे विश्वचषकासाठी या दोन्ही दिग्गजांनी हा निर्णय घेतला होता. पण आगामी टी-20 विश्वचषकात ये दोघे खेळणार की युवा खेळाडूंना संधी मिळणार हे पाहाण्यासारखे असेल. माध्यमांतील वृत्तांनुसार बीसीसीआयने टी-20 कारकिर्दीबाबत भविष्यात काय निर्णय घ्यायचा, हे सर्वस्वी रोहित आणि विराटवर सोपवले आहे. कदाचीत रोहित यापुढे टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसणार नाही, अशाही बातम्या समोर आल्या आहेत. (After Australia beat India in the World Cup final Samaira gives Information about Rohit Sharma’s situation)
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियानंतर द्रविड होणार ‘या’ आयपीएल टीमचा मुख्य प्रशिक्षक? लवकरच होऊ शकते घोषणा
200 पेक्षा जास्त वनडे सामने खेळणारे भारतीय क्रिकेटपटू, ज्यांना एकही वनडे विश्वचषक जिंकता आला नाही