पाकिस्तान क्रिकेट संघात सध्या खळबळ उडाली आहे. कारण पाकिस्तानचा स्टार सलामीवीर फलंदाज बाबर आझमने (Babar Azam) टी20 आणि एकदिवसीय फाॅरमॅटच्या कर्णधारपदावरून राजीनामा दिला आहे. पण पाकिस्तानने अद्याप नव्या कर्णधाराची घोषणा केली नाही. विशेषत: पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदाच्या बाबतीत इतके बदल झाले आहेत की, कधी-कधी पाकिस्तान संघाचा कर्णधार कोण हे सांगणे कठीण होते.
पाकिस्तान संघाकडे कर्णधारपदासाठी बरेच पर्याय आहेत, पण यावेळी संघ व्यवस्थापन कोणावर विश्वास ठेवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांतील पाकिस्तानी संघाची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. त्यांचा संघातील हा गोंधळ 2023च्या एकदिवसीय विश्वचषकापासून सुरू झाला आणि 2024च्या टी20 विश्वचषकापर्यंत कायम राहिला.
शान मसूदच्या (Shan Masood) नेतृत्वाखालील कसोटी मालिकेत पाकिस्तानची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. मात्र, सुदैवाची गोष्ट म्हणजे या कर्णधाराची बॅट चांगली चालली आहे, त्यामुळे त्याच्यावर सध्या प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. पण बाबर आझमनंतर (Babar Azam) कर्णधारपदाबद्दल बोलायचे झाले, तर शादाब खान, फखर जमान, मोहम्मद रिझवान आणि हारिस रौफ ही नावे सध्या निवडकर्त्यांच्या नजरेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN; “भारताला पराभूत करण्यात आम्ही…” टी20 मालिकेपू्र्वीच बांगलादेशच्या खेळाडूचे मोठे वक्तव्य!
IND vs BAN; टी20 मालिकेपूर्वी भारताला मोठा झटका! ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर
आश्चर्यकारक! वनडेमध्ये ‘या’ एकाच सामन्यात झाले होते सर्वाधिक RUN-OUT