मागील ३ सामन्यात अपयश हाती आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने रविवारी (११ ऑक्टोबर) दमदार पुनरागमन केले. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानने ५ विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान आपल्या जोरदार फटकेबाजीने राजस्थानला हातातून निसटणारा सामना जिंकून देणारा रियान पराग भलताच खूश झाला आणि त्याने मैदानावरच नाचत आनंद साजरा केला.
झाले असे की, हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १५८ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानच्या वरच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. डावातील १२ षटकांच्या आतच संघाचा स्कोर ७८ असताना बेन स्टोक्स, स्टिव्ह स्मिथ, जोस बटलर, रॉबिन उथप्पा आणि संजू सॅमसन यांनी त्यांच्या विकेट्स पडल्या होत्या.
पण ६व्या आणि ७व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तेवतिया आणि परागने षटकार-चौकारांचा वर्षाव करत १९व्या षटकापर्यंत संघाची धावसंख्या १५१ धावांवर आणली. आता राजस्थानला विजयासाठी अंतिम षटकात ७ धावांची आवश्यकता होती. हैदराबादचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट खलील अहमद २०वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकातील ५ चेंडूंवर तेवतिया आणि पराग एकाही चेंडूला सीमारेषेबाहेर पाठवू शकले नाहीत.
पण परागने २०व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जोरदार षटकार मारला आणि राजस्थानने ५ विकेट्सने सामना खिशात घातला. आपल्या संघाला सामना जिंकून दिल्यामुळे परागला आनंद अनावर झाला आणि तो मैदानावरच सर्व खेळांडूसमोर आसामचे पारंपारिक बिहू नृत्य करु शकला. परागचा तो डान्स चाहत्यांना फारच आवडल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याचा नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/PriyankaJShukla/status/1315352825006710784
https://twitter.com/DADULDUTTA8/status/1315315618510336002?s=20
https://twitter.com/kiru224/status/1315311030675943426?s=20
एका चाहत्याने तर त्या व्हिडिओला कमेंट करत म्हटले की, “आयपीएल सुरु होण्यापुर्वी रियानने सांगितले होते की त्याला सामना जिंकल्यानंतर एकदा तरी मैदानावर आनंद साजरा करायचा आहे आणि त्याने त्याचे वक्तव्य खरे ठरवले.”
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्लीची गाडी डगमगणार? गोलंदाजांना नडणारा रिषभ पंत ‘इतक्या’ दिवसांसाठी संघाबाहेर
IPL 2020 : आज बेंगलोर-कोलकाता येणार आमने सामने, पाहा सामन्याबद्दल सर्वकाही
धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीला गुजरातमधून अटक
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष.! क्रिकेटवर मनापासून प्रेम करणारा दर्दी ‘महानायक’
‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा






