---Advertisement---

फरारीनंतर हार्दिक पांड्याने खरेदी केली नवी आलिशान कार; किंमत करोडोंमध्ये, गर्लफ्रेंडला दिली भेट?

On: रविवार, मार्च 29, 2026 6:57 PM
---Advertisement---

काही दिवसांपूर्वीच हार्दिक पांड्याने फरारी (Ferrari 12Cilindri) खरेदी केली होती, ज्याची किंमत साधारण १२ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते. आता त्याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका महागड्या गाडीचा समावेश झाला आहे. हार्दिकने आता मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास (Mercedes-Benz V-Class) खरेदी केली आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये पांड्या आपली गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिच्यासोबत कारची चावी घेताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर ‘ऑटोहॅंगर’च्या पेजवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “ऑटोहॅंगर अभिमानाने भारतातील पहिली मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लास हार्दिक आणि माहिका यांच्या सुपूर्द करत आहे.”

​हार्दिक पांड्याच्या नवीन कारसोबतचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. पांड्याने ही कार आपली गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिला भेट (Gift) म्हणून दिली असावी, असा कयास चाहत्यांकडून लावला जात आहे. याच महिन्यात जेव्हा हार्दिकने आपली फरारी पहिल्यांदा घरी आणली होती, तेव्हा माहिकानेच त्या गाडीची पूजा केली होती.

​हार्दिक पांड्याने खरेदी केलेल्या मर्सिडीज-बेंझ व्ही-क्लासची भारतातील एक्स-शोरूम किंमत १.४० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे, तर तिची ऑन-रोड किंमत १.६० कोटी रुपये आहे. ही एक अतिशय आलिशान कार असून ती दोन व्हेरिएंट्समध्ये (V 300 डिझेल आणि पेट्रोल हायब्रीड) उपलब्ध आहे.

​हार्दिक पांड्या IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. २०२४ पासून तो या फ्रँचायझीचे नेतृत्व करत आहे, त्यापूर्वी २०२२ ते २०२३ पर्यंत तो गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. गुजरातमध्ये त्याचा पगार १५ कोटी रुपये होता आणि याच किमतीत तो मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला होता. २०२५ मध्ये त्याचा पगार वाढून १६.३५ कोटी रुपये झाला. IPL 2026 मध्येही त्याचा पगार १६.३५ कोटी रुपये इतकाच आहे. याशिवाय, पांड्या बीसीसीआय (BCCI) सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट आणि ब्रँड जाहिरातींमधूनही मोठी कमाई करतो. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आजपासून IPL 2026 मधील आपल्या मोहिमेची सुरुवात करत आहे. संघाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---