सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. त्यातील तिसरा कसोटी सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर बुधवारपासून (२५ ऑगस्ट) सुरू झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या डावातील फलंदाजांच्या निराशाजनक खेळीनंतर भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडला ४३२ धावांवर रोखले आणि भारताला ३५४ धावांचे आव्हान मिळाले. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाज सावधानीने फलंदाजी करताना दिसले. दरम्यान अर्धशतक झळकावल्यानंतर भारताचा सलामीवीर रोहित शर्मा दुर्दैवीपणे बाद झाला.
त्याचे झाले असे की, नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत भारतीय संघाला केवळ ७८ धावांमध्ये रोखले. नंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लिश फलंदाजांनी मात्र भारतीय गोलंदाजांना खूप थकवले.
पहिल्या डावात इंग्लंडने कर्णधार जो रूटच्या शतकी खेळीच्या जोरावर ४३२ धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडला ३५४ धावांची मोठी आघाडी मिळाली. यानंतर आपल्या दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब राहिली. सलामीचा फलंदाज केएल राहुल (०८ धावा) स्वस्तात बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, ४८ व्या षटकात भारतीय संघाची स्थिती ११६ वर १ अशी असताना ऑली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा पायचित झाला. यानंतर त्याने लगेचच पंचांकडे रिव्ह्यूची मागणी केली. मात्र त्यातही तो बाद झाल्याचे स्पष्ट झाले. अशाप्रकारे रोहित शर्मा अर्धशतकी खेळी करून चांगल्या लयीत असताना ५९ च्या धावसंख्येवर पव्हेलियनला परतला. बाद झाल्यानंतर त्याचे तोंड पडले होते.
Breakthrough! 🙌
Scorecard/Videos: https://t.co/UakxjzUrcE
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/f6CXizlTUo
— England Cricket (@englandcricket) August 27, 2021
दरम्यान, तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाची स्थिती २१५ वर २ अशी राहिली, ज्यामध्ये गेल्या काही काळापासून लय शोधत असलेला चेतेश्वर पुजारा ९१ धावांवर नाबाद खेळत आहे. तर त्याच्या सोबतीला कर्णधार विराट कोहली नाबाद ४५ धावांवर खेळत आहे. यासह भारतीय संघ अजूनही इंग्लंडपेक्षा १३९ धावांनी पिछाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘ईसीबीला हटवा, कसोटी क्रिकेट वाचवा’; हेडिंग्ले स्टेडियमवर मोठ्या बॅनरसह आकाशात उडताना दिसले विमान
–रोहितच्या विकेटनंतर विराटऐवजी फलंदाजीला आला ‘तो’, पाहून पुजाराही बुचकळ्यात; व्हिडिओ व्हायरल
–अद्भुत, अविश्वसनीय! जॉनी बेयरस्टोने घेतला एकहाती अप्रतिम कॅच; पाहा व्हिडिओ