---Advertisement---

गायकवाडनंतर आता धोनीला दुखापत, पुढच्या सामन्यात माही खेळणार की नाही?

---Advertisement---

चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांना धक्का बसणारी माहिती समोर येत आहे. महेंद्रसिंग धोनी दुखापती झाला आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्ससाठी लखनऊ विरुद्ध सामन्यात कमालीची पारी खेळली आणि संघाला विजय देखील मिळवून दिला. धोनी या सामन्यादरम्यान पायामध्ये दुखत असल्याने त्रासात दिसत होता. तो सामन्यानंतर सुद्धा अडचणीत दिसत होता, यानंतर एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे, त्याच्याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

धोनी चेन्नईसाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने यादरम्यान 11 चेंडूत नाबाद 26 धावा केल्या, त्याने यादरम्यान चार चौकार तसेच एक षटकार झळकावला. शेवटच्या षटकात तो अडचणीत दिसत होता. सामन्यानंतर सुद्धा तो आरामात चालू शकत नव्हता. महेंद्रसिंग धोनीला या आधी सुद्धा पायाला दुखापत झाली होती त्यानंतर तो काही वेळ खेळू शकला नव्हता.

चेन्नई आणि मुंबई सामना रविवार 20 एप्रिल रोजी खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यांमध्ये धोनी खेळणार की नाही? हे त्याच्या फिटनेसवर निर्भर करेल. सध्या धोनी विषयी चेन्नई सुपर किंग्सने कोणती अपडेट दिलेली नाही. जर धोनी पूर्णरित्या ठीक नसेल, तर तो येणाऱ्या काही सामन्यांमधून बाहेर पडू शकतो.

चेन्नई संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आधीच दुखापतीच्या कारणाने स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी चेन्नईने आयुष म्हात्रेला संघात सामील केले आहे. चेन्नईने या हंगामात सलग पाच सामने गमावले आहेत, पण त्यांनी लखनऊ विरुद्ध चांगलं पुनरागमन करत सामना जिंकला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---