ऑगस्ट 2025 मध्ये इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघ बांग्लादेशचा दौरा करेल. भारत आणि बांगलादेश यांच्यात 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका होईल. बीसीसीआयने या मर्यादित षटकांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बांग्लादेशचा हा दौरा 17 ऑगस्टपासून सुरू होईल आणि 31 ऑगस्टपर्यंत चालेल. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होईल. एकदिवसीय मालिकेतील तीन सामने 17, 20, आणि 23 ऑगस्ट रोजी खेळवले जातील, तर टी-20 आंतरराष्ट्रीय सामने 26, 29 आणि 31 ऑगस्ट रोजी खेळवले जातील.
THE SCHEDULE OF INDIA vs BANGLADESH 2025:
— Tanuj (@ImTanujSingh) April 15, 2025
1st ODI – 17th Aug at Mirpur.
2nd ODI – 20th Aug at Mirpur.
3rd ODI – 23rd Aug at Chattogram.
1st T20I – 26th Aug at Chattogram.
2nd T20I – 29th Aug at Mirpur.
3rd T20I – 31st Aug at Mirpur. pic.twitter.com/6fi9NaDiDF
भारत विरुद्ध बांगलादेश एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना: 17 ऑगस्ट – मीरपूर
दुसरा एकदिवसीय सामना: 20 ऑगस्ट – मीरपूर
तिसरा एकदिवसीय सामना: 23 ऑगस्ट – चट्टोग्राम
भारत विरुद्ध बांगलादेश टी20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी२०: 26 ऑगस्ट – चट्टोग्राम
दुसरा टी२०: 29 ऑगस्ट – मीरपूर
तिसरा टी२०: 31 ऑगस्ट – मीरपूर
सध्या सर्व भारतीय खेळाडू इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 18व्या आवृत्तीत खेळत आहेत. आयपीएल संपल्यानंतर, टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करेल. टीम इंडिया जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंड मालिका 4 ऑगस्ट रोजी संपेल. भारताचा देशांतर्गत हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल. ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर येईल.





