---Advertisement---

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता वैभव सूर्यवंशी करणार अभ्यास; ‘या’ परीक्षेसाठी करणार खास तयारी

On: सोमवार, फेब्रुवारी 9, 2026 10:15 PM
---Advertisement---

टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) आता क्रिकेटच्या बॅटऐवजी हातात पेन धरणार आहे. वैभव आता आपल्या शालेय परीक्षेच्या तयारीला लागणार आहे.

वैभव सूर्यवंशी आगामी CBSE 10 वीच्या परीक्षेची तयारी करत आहे. रिपोर्टनुसार, त्याचा परीक्षा फॉर्म भरला गेला असून तो समस्तीपुर (बिहार) येथील ताजपुरमधील एका शाळेतून शिक्षण घेत आहे. क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे शाळा प्रशासनही त्याला अभ्यासात मोठी मदत करत असते. आता काही दिवस वैभव फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आहे.

अंडर-19 वर्ल्ड कप 2026 गाजवल्यानंतर वैभव आता IPL 2026 मध्ये खेळताना दिसेल. राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघात कायम (Retain) ठेवले आहे. गेल्या आयपीएल सीझनमध्ये वैभवने अवघ्या 35 चेंडूत शतक झळकावून आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला होता. गेल्या सीझनमध्ये त्याने 7 सामन्यांत 36 च्या सरासरीने 252 धावा केल्या होत्या.

वर्ल्ड कपमध्ये वैभवने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच थक्क केले. तो या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 7 सामन्यांत 62.71 च्या सरासरीने 439 धावा केल्या. फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध वैभवने अवघ्या 80 चेंडूत 175 धावांची ऐतिहासिक खेळी केली. यात त्याने 15 चौकार आणि 15 षटकार ठोकले. वैभवच्या या खेळीच्या जोरावर भारताने फायनलमध्ये इंग्लंडचा 100 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---