---Advertisement---

SRHvsMI । टॅलेंटवर भारी पडला अनुभव, पियुष चावलाच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला थ्रिल

On: बुधवार, एप्रिल 19, 2023 6:47 PM
Piyush Chawla
---Advertisement---

आयपीएलचा 16वा हंगाम यावर्षी खेळला जात आहे. भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज पियुष चावला मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. 34 वर्षीय चावलाकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह आयपीएल खेळण्याचा मोठा अनुभव आहे. हाच अनुभव मुंभई इंडियन्ससाठी मंगळवारी (18 एप्रिल) कामी आला. मुंबईने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 14 धावांनी विजय मिळवला.

मुंबई इंडियन्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करून 5 बाद 192 धावा केल्या होत्या. सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांना निर्धारित 20 षटकात गाठता आले नाही. हैदराबाद संघ 20 षटकांमध्ये 178 धावांपर्यंत मजल मारू शकला. दक्षिण आफ्रिका संघाचा यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेन () या सामन्याच जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि हैदराबादला विजय देखील मिळवून देऊ शकत होता. मात्र, पियुष चावला (Piyush Chawla ) याच्या अनुभवापुढे क्लासेनला देखील गुडघे टेकण्याची वेळ आली.

हैदराबादच्या डावातील 14 व्या षटकात पियुष चावला गोलंदाजीला आला होता. चावलाच्या पहिल्या चेंडूवर मयंक अगरवाल याने एक धाव घेऊन हेनरिक क्लासेनला स्ट्राईक दिली. पुढच्याच चेंडूवर क्लासेनने चौकार मारला. त्यानंतर षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर दोन जबरदस्त षटकार क्लासेनने मारले. त्यानंतर षटकातील पाचव्या चेंडूवर क्लासेसनने पुन्हा चौकार मारला. चावलाच्या शेवटच्या चेंडूवर देखील हैदराबादला चौकार किंवा षटकार मिळणार, असे वाटत होते. पण चावलाने या चेंडूवर आपला आजवरचा क्रिकेट अनुभव वापरून मुंबई इंडियन्ससाठी क्लासेनची महत्वपूर्ण विकेट मिळवली. त्याने षटकाच्या शेवटी ऑफ स्टंपवर लेंथ बॉल टाकला, जो क्लासेनने थेट लॉन्ग ऑनवर उभा अशलेल्या टिम डेविडच्या हातात मारला. क्लासेनने अवघ्या16 चेंडूत संघासाठी 36 धावांचे योगदान दिले.

पियुष चावला चालू आयपीएल हंगामात चांगल्या लयीत दिसथ आहे. त्याने आतापर्यंतच्या पाच सामन्यात 20 च्या सरासरीने आणि 7.15च्या इकोनॉमी रेटने 7 विकेट्स घेतल्या आहेत. 22 धावा खर्च करून तीन विकेट्स हे त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन राहिले आहे. पियुष चावलाने घेतलेली क्लासेनची विकेट मुंबई इंडियन्ससाठी महत्वाची होती. मात्र, या सामन्यादरम्यान एक नकोसा विक्रम चावलाच्या नावावर झाला. आयपीएल इतिहासात फलंदाजांकडून चावलाच्या गोलंदाजीवर सर्वाधिक षटकार मारले गेले आहेत. (After hitting two fours and two sixes, Piyush Chawla took the wicket of Heinrich Klaasen on the last ball)

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार देणारे गोलंदाज
185 – पियुष चावला
182 – युजवेंद्र चहल
180 – रवींद्र जडेजा
176 – अमित मिश्रा
173 – रवि अश्विन

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार देणारे वेगवान गोलंदाज
155 – ड्वेन ब्रावो
135 – उमेश यादव
130 – जयदेव उनादकट
116 – भुवनेश्वर कुमार
113 – मोहम्मद शमी

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

सेहवाग म्हणतोय, ‘संजूआधी राहुल टीम इंडियात खेळण्याचा हकदार’
रोहितने आणि सचिनच्या ‘त्या’ शब्दांनी बदलला तिलकचा ‘माईंडसेट’, आता घालतोय धावांचा रतीब

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---