विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारतीय संघाला आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपायश आले आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर १० गडी राखून जोरदार विजय मिळवला होता. तर रविवारी (३१ ऑक्टोबर) न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग कठीण झाला आहे. दरम्यान न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर रवी शास्त्री यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघातील फलंदाजांनी या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. फलंदाजांची अशी कामगिरी पाहून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील नाराज दिसून आले. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे नेटकऱ्यांनी रवी शास्त्रींना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
Ravi Shastri to ICC after the first two matches #INDvsNZ pic.twitter.com/XMFo9GmNWO
— Sand-d Singh (@Sand_In_Deed) October 31, 2021
#BanIPL
Ravi shastri welcom back to the commentry panel 😂😂😂😂😂👍👍👍@lonely_javed pic.twitter.com/Rl69Gw1Q0C— JAVED66 (@lonely_javed) October 31, 2021
Ravi Shastri's face, it's like he already knows that he is out of the competition 😂😂😂😂😂 pic.twitter.com/QxG3FVFUQw
— Manjenjenje (@LilMel5) October 31, 2021
रवी शास्त्री यांच्यावरील बरेचसे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यानंतर देखील त्यांना ट्रोल केले जात आहे. एका युजरने त्यांचा फोटो शेअर करत लिहिले की, “रवी शास्त्री यांचा चेहरा पाहून तर असच वाटतंय की, रवी शास्त्री यांना आधीच कल्पना असेल की, भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे.”
Ravi shastri- ye IPL and world Cup 👇👇👇👇 pic.twitter.com/P41e2DyeYC
— V. (@blue_koffeee) October 31, 2021
Ravi shastri to #indianteam after their performance in #T20WorldCup pic.twitter.com/UPa9zSUi0V
— कच्चू (@Kachutachu) November 1, 2021
तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “नवीन मुख्य प्रशिक्षक येणार आहे. त्यामुळे रवी शास्त्री नाराज आहेत.” तसेच आणखी एका युजरने लिहिले की, “असे वाटते की, रवी शास्त्री यांना ते सर्व माहीत आहे जे आपल्याला माहीत नाही. समालोचन कक्षात तुमचे स्वागत आहे.”
https://twitter.com/justdiesadia/status/1454862359739224072?s=20
https://twitter.com/_UnrealDaniel/status/1454820835840118785?s=20
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धा ही मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांची शेवटची स्पर्धा असणार आहे. त्यानंतर या संघाचे मुख्य प्रशिक्षकपद राहुल द्रविड यांना देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
तसेच न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर,या सामन्यात न्यूझीलंड संघांने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक २६ तर हार्दिक पंड्याने २३ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटक अखेर ७ बाद ११० धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाकडून मिचेलने सर्वाधिक ४९ आणि केन विलियमसनने ३३ धावांची खेळी करत न्यूझीलंड संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
केन विलियम्सनने सांगितला आपला मास्टरप्लॅन, ‘या’ रणनितीसह भारतावर मिळवला एकतर्फी विजय
पहिल्याच चेंडूवर झेलबाद होण्यापासून वाचला रोहित, रितीकाच्या जीवात आला जीव; पाहा रिऍक्शनचा व्हिडिओ
श्रीलंकन टायगर्स थांबवणार का इंग्लंडचा विजयरथ? आज दोन्ही संघांमध्ये रंगणार अटीतटीची लढत