मुंबई | आयपीएल प्रमाणेच्या प्रो-कबड्डीच्या ६व्या हंगामासाठी यावेळी लिलावात आरटीएम Right to Match (RTM) वापरता येणार आहे. यावेळी प्रथमच आयपीएलमध्ये आरटीएमचा वापर करण्यात आला होता. याच धर्तीवर यावेळी प्रो-कबड्डीतही या पध्दतीचा वापर करण्यात येणार आहे.
यावेळी प्रो-कबड्डीत १२ संघ असून याची सुरूवात १९ आॅक्टोबरला होणार आहे. यावेळी पुन्हा नव्याने लिलाव होणार आहे. याच महिन्याच्या सुरूवातीलाच ६व्या हंगामासाठी ९ संघानी २१ खेळाडूंना केले कायम होते.
यामूळे काही दिग्गज खेळाडूंसाठी संघ आरटीएम Right to Match (RTM) वापरून ५व्या हंगामासाठी पुन्हा आपल्या संघात घेऊ शकतात.
यावेळी आरटीएम Right to Match (RTM) साठी प्रो-कबड्डीत काही नियम करण्यात आले आहेत. ते असे-
- ज्या संघांनी ५व्या हंगामातील ४ elite खेळाडू कायम केले आहेत त्यांना आरटीएम Right to Match (RTM) वापरून केवळ १ खेळाडू कायम करता येईल.
- ज्या संघांनी ५व्या हंगामातील ३ किंवा त्यापेक्षा कमी elite खेळाडू कायम केले आहेत त्यांना आरटीएम Right to Match (RTM) वापरून केवळ २ खेळाडू कायम करता येईल.
या स्टार खेळाडूंनाही नाही केले कायम-
अनूप कुमार, नितीन तोमर, रिशांक देवडीगा, सुरेंदर नाडा, मोहीत चिल्लर, मनजीत चिल्लर, दिपक हुडा, सुकेश हेगडे.
संघात कायम केलेले खेळाडू-
पाटणा पायरेट्स : प्रदीप नरवाल, जयदीप, जवाहर डागर, मनीष कुमार
पुणेरी पलटण : संदीप नरवाल, राजेश मोंडल, जी. बी. मोरे, गिरीश ईर्नाक
गुजरात फॉर्च्यूनजायंट्स : सचिन, सुनील कुमार, महेंद्र रजपूत
तामिळ थलायव्हास : अजय ठाकूर, अमित हुडा, सी. अरुण
तेलुगू टायटन्स : नीलेश साळुंखे, मोहसीन मॅघसॉडलो जाफारी
बंगाल वॉरियर्स : सुरजीत सिंग, मणिंदर सिंग
बेंगळूरु बुल्स : रोहित कुमार
दबंग दिल्ली : मेराज शेख
हरयाणा स्टीलर्स : कुलदीप सिंग