यावर्षी भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी श्रीलंका संघ थेट प्रवेश मिळणार नाहीये. शुक्रवारी (31 मार्च) श्रीलंकन संघाने विश्वचषकासाठी पात्र ठरण्याची शेवटची संधी गमावली. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर श्रीलंका संघ आगामी विश्वचषकासाठी क्लालिफाय करू शकला नाही.
श्रीलंका संघ तीन सामन्यांच्या वनडे आणि तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. वनडे मालिका शुक्रवारी संपली. मालिकेतील पहिला आणि तिसरा सामना यजमान न्यूझीलंड संघाने जिंकला. मालिकेतील दुसरा सामना निकाली निघू शकला नाही. शुक्रवारी न्यूझीलंडकडून पारभव मिळाल्यानंतर श्रीलंका विश्वचषकासाठीच्या सुपर लीगमध्ये आठवा क्रमांक मिळवू शकला नाही. श्रीलंकन संघ जर या सामन्यात जिंकला असता, तर सुपर लीगमध्ये आपला आठवा क्रमांक पटकावू शकत होता. परिणामी वनडे विश्वचषकात श्रीलंकान संघाला थेट खेळण्याची संधी मिळाली असती.
अशात श्रीलंकन संघाला जर आता विश्वचषकात खेळायचे असेल, तर क्वालिफायर सामने खेळावे लागतील. जून 2023 मध्ये विश्वचषकासाठी क्वालिफायर सामने खेळले जातील. मागच्या 44 वर्षांमध्ये ही पहिली वेळ आहे, जेव्हा श्रीलंका संघ विश्वचषकासाठी क्वालिफायर सामना खेळणार आहे. विश्वचषक 2023 मध्ये सुपर लीगमध्ये पहिल्या सात क्रमांकांवर असणारे संघ खेळणार आहेत. आठव्या क्रमांकावरील संघ देखील विश्वचषकासाठी थेट पात्र ठरेल. आठव्या क्रमांकावर सध्या वेस्ट इंडीज आहे. पण ही जाबा दक्षिण आफ्रिका संघ घेऊ शकतो. आफ्रिका संघाला सुपर लीगचे अजून दोन सामने खेळायचे आहेत, ज्यामध्ये विजयासाठी संघ पूर्ण प्रयत्न करेल.
दरम्यान न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील या तिसऱ्या वनडेचा विचार केला, तर श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण फलंदाजांना अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. 41.3 षटकांमध्ये श्रीलंकन संघआने 157 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने हे लक्ष्य 4 विकेट्सच्या नुकसानावर 32.5 षटकांमध्ये गाठले. (After losing to New Zealand, the Sri Lanka team will have to play qualifiers before the ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय मूळ असलेल्या पठ्ठ्याची धमाल! कमी वयात यूएईविरुद्ध ठोकले शतक, वाचवली अमेरिकेची लाज
‘बाबरला खरेदी करण्यासाठी मी सगळा पैसा खर्च केला असता…’, इंग्लिश गोलंदाजाची मोठी प्रतिक्रिया