कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि खेळाडूंच्या सुरक्षिततेला पाहता मे महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२१ ला (आयपीएल) स्थगिती देण्यात आली होती. मात्र भारतीय नियामक मंडळने (बीसीसीआय) आयपीएलचे उर्वरित सामने युएईत खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. १९ सप्टेंबरपासून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज संघातील सामन्याने उर्वरित हंगामाची सुरुवात होणार आहे.
त्यामुळे सर्व संघ आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. आयपीएलचा संघ चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) नुकताच यूएईला पोहोचला आहे. यादरम्यान सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, त्याच्या पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत विमानतळावर दिसून आला आहे. त्यांचा विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
Mahi way ➡️ #Yellove Way! 💛#WhistlePodu 🦁 pic.twitter.com/1DYHgaKHS9
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 13, 2021
त्याचबरोबर सीएसके संघातील सुरेश रैना, अंबाती रायडू, रॉबिन उतप्पा, ऋतुराज गायकवाड, दीपक चहर, कर्ण शर्मा आणि केएम आसिफ देखील यूएईला रवाना झाले आहेत. रवाना होण्यापूर्वी सीएसकेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून यासंबंधी काही फोटो शेअर केले होते, ज्यावर लिहिले होते, “गेट रेडी फोक्स”
Touchdown
📍Whistles Kingdom, UAE#UrsAnbudenEverywhere #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/z2pkKWtCws
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 13, 2021
✈️ Mode ON#UrsAnbudenEverywhere#WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/yHE4c2Qk4X
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 13, 2021
तसेच मुंबई इंडियन्स संघ याआधीच शुक्रवारी १३ ऑगस्टला यूएईला रवाना झाला आहे. सध्या मुंबई इंडियन्सचा संघ यूएईत विलगीकरणात असून काही दिवसातच सरावाला सुरुवात करणार आहे. मुंबई इंडियन्सने देखील रवाना होण्यापूर्वी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
दरम्यान, सीएसके संघाचे खेळाडू महेंद्र सिंग धोनी आणि सुरेश रैना या दोघांनी एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर हे दोघे आता सीएसकेकडून एकत्र खेळताना दिसतात. त्याचबरोबर सुरेश रैना अजूनही सय्यद मुस्ताक अली स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळतो.
सीएसकेचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी
आयपीएलचा उर्वरित दुसरा टप्पा यूएईमध्ये होणार आहे, ज्यात १९ सप्टेंबरला पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात सीएसकेने ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत. त्यामुळे १० गुणांसह गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. मुंबई इंडियन्स संघ ७ पैकी ४ सामने जिंकून ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर सर्वाधिक ८ पैकी ६ सामन्यात विजय मिळवून दिल्ली कॅपिटल्सचा संघ १२ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
–डाव्या हाताने क्रिकेटमध्ये उजवी कामगिरी करणारे दिग्गज भारतीय खेळाडू, पाहा खास आकडेवारी
–‘अरे भाऊ, मस्त!’, हार्दिकच्या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो
–‘या’ठिकाणी चुकतो विराट, दिग्गज भारतीयाने कोहलीच्या फलंदाजीचे केले विश्लेषण