---Advertisement---

“तोही माझ्या मुलासारखाच आहे” पाकिस्तानच्या अर्शदच्या आईनं निरज चोप्राला दिला खास संदेश

Arshad Khan's Mother (1)
---Advertisement---

अर्शद नदीमनं पॅरिस ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धेत (Arshad Nadeem) पाकिस्तानसाठी सुवर्णपदक जिंकलं. तर नीरज चोप्रानं भारतासाठी रौप्य पदक जिंकलं. या दोन्ही खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये आपापल्या देशाचा ध्वज फडकावला. नीरजच्या आईनं नुकतंच अर्शदचं कौतुक केलं होतं आणि त्याला आपल्या मुलासारखं संबोधलं होतं. त्यावर आता अर्शद नदीमच्या आईची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी भारताच्या सुपुत्रासाठी सीमेपलीकडून संदेश दिला आहे. अर्शदच्या आईनं सांगितलं की, नीरजही तिच्या मुलासारखा आहे.

अर्शद नदीमची आई नीरजबद्दल बोलताना म्हणाली, “तोही माझ्या मुलासारखा आहे. तो नदीमचा मित्र तसंच भाऊ आहे. जिंकणं आणि हरणं ही नशिबाची बाब आहे. तोही माझा मुलगा आहे. अल्लाह मियाँ त्यालाही यशस्वी करो. ते दोघे भाऊ आहेत आणि मी दोघांसाठी प्रार्थना करते.” यापूर्वी नीरजच्या आईनंही अर्शदचं कौतुक केलं होतं. अर्शद हा आपल्या मुलासारखा असल्याचंही निरजच्या आईनं सांगितलं होतं.

अर्शदनं भालाफेकमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकावला. त्यानं ऑलिम्पिक विक्रम केला. अर्शदनं 92.97 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. त्यानंतर 88.72 मीटर, 79.40 मीटर, 84.87 मीटर आणि शेवटी 91.79 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला आणि सुवर्णपदकावर त्याचं नाव कोरलं. नीरजबद्दल बोलायचं झालं, तर त्याला ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक मिळालं. नीरजचे 6 पैकी 5 प्रयत्न फाऊल होते. पण त्याचा एकच प्रयत्न कामी आला. नीरजनं 89.45 मीटर अंतरापर्यंत भालाफेक करून रौप्यपदक जिंकलं. तर कांस्यपदक पीटर्स अँडरसननं पटकावले.

महत्त्वाच्या बातम्या-

सिल्वर मेडल मिळवणाऱ्या नीरज चोप्राला मोदींचा काॅल, दुखापतीबद्दल काय म्हणाले?
‘हे’ 3 दिग्गज खेळाडू उतरणार आयपीएलच्या मेगा लिलावात? संघांमध्ये होणार स्पर्धा?
गोलकीपर श्रीजेशचा मोठा सन्मान! मनू भाकरसोबत मिळाली ही महत्त्वाची जबाबदारी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---