---Advertisement---

कमालच! जोकोविचने जागतिक क्रमवारीत सहाव्यांदा पटकावला अव्वल क्रमांक; केली ‘या’ दिग्गजाच्या विक्रमाची बरोबरी

On: सोमवार, नोव्हेंबर 16, 2020 9:05 PM
---Advertisement---

सर्बियाचा महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने रविवारी (१५ नोव्हेंबर) सहाव्यांदा जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला. असा कारनामा करणारा तो टेनिस इतिहासातील केवळ दुसरा खेळाडू बनला आहे.

जोकोविचने सहाव्यांदा जागतिक अव्वल क्रमांक पटकावत हंगामाचा शेवट केला. त्याने यापूर्वी २०११, २०१२, २०१४, २०१५ आणि २०१८ मध्ये जागतिक अव्वल क्रमांक पटकावला होता.

जोकोविचव्यतिरिक्त पीट सॅम्प्रसने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत सहाव्यांदा जागतिक अव्वल क्रमांक पटकावत वर्षाचा शेवट केला आहे. त्याने १९९३ ते १९९८ पर्यंत अव्वल क्रमांकावर राहत वर्षाचा शेवट केला होता.

जोकोविच सध्या एटीपी फायनल्समध्ये भाग घेत आहे. त्याने एटीपी वेबसाईटशी बोलताना म्हटले, “मी खूप खुश आहे. आपल्या सर्वांसाठी हे ६ महिने खूप विचित्र राहिले. आपण ऑगस्टमध्ये हंगामाची सुरुवात केली होती. मी हे जिथून सोडले होते, तिथून सुरू ठेवले आहे. ज्याप्रकारे गोष्टी पुढे गेल्या, त्यामुळे मी खूप खुश आहे. ”

वाचा-

“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिर्ची…”, युवराज सिंगकडून सानिया मिर्झाला अनोखी उपाधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---