---Advertisement---

IPL 2025 स्पर्धा स्थगित केल्यानंतर उर्वरित सामने कधी होणार?

On: शुक्रवार, मे 9, 2025 1:52 PM
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान मधील तणावामुळे शुक्रवारी (9 मे) रोजी आयपीएल स्पर्धेसंबंधित मोठा निर्णय घेत स्पर्धा स्थगित केली आहे. गुरुवार (8 मे) रोजी पाकिस्तानने भारताच्या काही शहरांमध्ये ड्रोन अटॅक केले, ज्याकारणाने धर्मशाळांमध्ये सुरू असलेला पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल सामना मध्येच रद्द करण्यात आला. आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्यानंतर बीसीसीआयची पहिली प्राथमिकता विदेशी खेळाडूंना त्यांच्या देशात परत पाठवण्याची आहे. बीसीसीआय स्पर्धेच्या पुढच्या तारखा लवकरच घोषित करेल.

आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यानंतर भारत देश प्रथम विदेशी खेळाडूंना त्यांच्या देशात सुरक्षितपणे पोहोचवण्याची योजना करेल. त्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे.

रिपोर्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, इंग्लंड मालिकेनंतर आयपीएल 2025 स्पर्धेचे उरलेले सामने पूर्ण केले जाऊ शकतात. टीम इंडियाला एक जून 2025 ते 31 जुलै 2025 दरम्यान इंग्लंडचा दौरा करायचा आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या कारणाने बीसीसीआयने आयपीएलचा 18 वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---