क्रिकेटविश्वात मागील काही वर्षापासून टी20 लीगचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातील काही देश तर कमी षटकांचे किंवा मोजक्याच चेंडूच्या लीगही खेळत आहेत. इंग्लंडमध्येे नुकताच द हंड्रेड लीगचा थरार संपला. तर ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगला डिसेंबरमध्ये सुरूवात होणार आहे. सध्या वेस्ट इंडिजमध्ये कॅरेबियन लीग सुरू आहे. तसेच भारताची इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सर्वाधिक प्रसिद्ध आहे. तर असे लीग क्रिकेट आयोजित करण्यात पाकिस्तानही मागे नाही. त्यांची पाकिस्तान सुपर लीग अर्थातच पीएसएल प्रसिद्ध आहे. त्यातच त्यांनी आणखी एक लीग सुरू केली आहे.
पाकिस्तान ज्युनियर लीग टी20 (पीजेएल) असे या नव्या लीगचे नाव आहे. ही स्पर्धा ऑक्टोबरमध्ये खेळली जाणार आहे. या लीगमध्ये सहा संघ खेळले जाणार आहेत. यामध्ये बहावलपूर रॉयल्स, गुजराणवाला जायंट्स, ग्वादर शार्क्स, हैद्राबाद हंटर्स, मर्दान वॉरियर्स आणि रावळपिंडी रायडर्स हे संघ आहेत. या संघाच्या मेंटर्सची नावेही पीजेएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर जाहीर केली आहेत.
PCB to retain team ownership rights for the inaugural edition of PJL as sides and their mentors are confirmed.
Complete details here ⤵️https://t.co/vTSA4OM9z4 pic.twitter.com/PiTkqeJjxq
— Pakistan Junior League (@ThePJLofficial) August 30, 2022
दक्षिण आफ्रिकेचा इम्नान ताहीर हा बहावलपूर संघाचा, शोएब मलिक गुजराणवालाचा, विवियन रिचर्ड्स हे ग्वादर, डॅरेन सॅमी हैद्राबाद, शाहिद आफ्रिदी मर्दानचा आणि रावळपिंडीचा न्यूझीलंडचा कोलीन मुन्रो हे संघांचे मेंटर आहेत.
19 वर्षाखालच्या या नवीन लीगचा लिलाव गुरूवारी (8 सप्टेंबर) सुरू झाला आहे. सुरूवातीला या लीगमध्ये संघ खरेदी करण्यासाठी कोणीही तयार नव्हता, अशा अफवांना पेव फुटले होते. जर खेळाडूंवर बोली लावण्यासाठी कोणीही पुढे आले नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) सर्व सुत्रे सांभाळणार होता. तसेच पीसीबच आता सर्व अधिकार आपल्याकडे ठेवणार आहे हे स्पष्ट झाले आहे. तर जावेद मियादांद हे स्पर्धेचे मेंटर आहेत.
Pakistan Junior League team names and logos unveiled
Read more: https://t.co/mFNbrLcCni#PJL #Next11 pic.twitter.com/69M1kO0k9Q
— Pakistan Junior League (@ThePJLofficial) September 8, 2022
ही लीग 5 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान खेळली जाणार आहे. या लीगमध्ये जवळपास 18 देशांतील 140 खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे. यामधील खेळाडू 15 ते 19 वयोगटातील असणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकात ‘या’ तीन चुका भारताला पडल्या महागात; जर टाळल्या तर टी-20 विश्वचषक आपलाच!
INDvsAFG सामन्यात ‘हे’ खेळाडू करणार खास खेळी! वाचा दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग अन् सामन्याची फॅन्टसी 11
नसीम शाहने मारलेल्या षटकारांचे रहस्य बॅटमध्ये दडलंय! विजयानंतर स्वत:च केला मोठा खुलासा