भारतीय संघाने दुसर्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली जोरदार पुनरागमन केले आहे. भारतीय संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेल्या अजिंक्य रहाणे या सामन्यात नाबाद शतकी खेळी साकारली. त्यामुळे भारतीय संघाने दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने 82 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे विराट कोहली त्याचे अभिनंदन केले. मात्र यावरून विराट कोहलीला चाहत्यांनी ट्रोल केले.
अजिंक्यचे अभिनंदन करणे विराटला पडले महागात
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट हा सध्या पालकत्व रजेवर मायदेशात आहे. त्यामुळे भारतीय संघाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर आहे. अजिंक्यने जबाबदारी योग्य पार पाडताना पहिल्याच डावात 104 धावांची नाबाद खेळी केली. त्यावर विराट कोहलीने त्याचे अभिनंदन करताना ट्विट केले होते. त्यावरून विराट कोहलीला चाहते ट्रोल करताना दिसत आहेत. त्यामुळे अजिंक्यचे अभिनंदन करणे विराटला चांगले महागात पडले आहे.
*Rahane scored 100 in second test match*
* Everyone start trolling Virat kohli *
Virat kohli be like: pic.twitter.com/BaYjnyqiKF
— rozgar_CA (@Memeswalaladka) December 27, 2020
एक चाहता विराटच्या या ट्विटला प्रत्युत्तर देताना म्हणाला, “नेहमीसाठी विराट कोहलीला कर्णधार पदावरून हटवले पाहिजे, आणि अजिंक्य रहाणेला नेहमीसाठी कर्णधारपद द्यायला पाहिजे.” दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजिंक्य रहाणे 104 धावावर नाबाद खेळत होता.
https://twitter.com/Selva_afc/status/1343104599637422084?s=19
विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यातनंतर मायदेशी परतला आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा त्यांच्या बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे विराट कोहली अशावेळी तिच्या सोबत राहण्यासाठी पालकत्व रजेवर भारतात आला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया संघाकडून 8 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले होते.
Kohli : "Another great day for US"
Rahane : pic.twitter.com/i9q7liNkXj— iChanakya (@Chainakya) December 27, 2020
भारतीय संघाची तिसर्या दिवसाखेर धावसंख्या
भारतीय संघाने 195 धावसंख्येवर ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव रोखला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने दुसर्या दिवसाअखेर 91.3 षटकात 5 बाद 277 धावसंख्या उभारली. यामध्ये सर्वाधिक धावा अजिंक्य रहाणेने केल्या. त्याने 200 चेंडूचा सामना करताना 104 धावांची नाबाद खेळी साकारली. त्याचबरोबर जडेजाने 40 धावांची नाबाद खेळी केली. या दोघांनी 6 गड्यासाठी नाबाद 104 धावांची खेळी केली.
महत्वाच्या बातम्या:
– IND vs AUS : रहाणे-जडेजाच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दुसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ ८२ धावांनी आघाडीवर
– गजब बेइज्जती है यार! आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम संघात एकाही पाकिस्तानी खेळाडूला स्थान न मिळाल्याने भन्नाट मिम्स व्हायरल
– कॅप्टनकूल धोनीची बाजी! टी२० पाठोपाठ आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम वनडे संघाचाही कर्णधार