---Advertisement---

एक फोटो किती महागात पडू शकतो हे या क्रिकेटरला सोडून कुणालाही माहित नसेल

On: शनिवार, ऑगस्ट 15, 2020 5:02 PM
---Advertisement---

मुंबई । केंट या इंग्लंडमधील क्लबचा नव्या दमाचा 19 वर्षीय फलंदाज जॉर्डन कॉक्सला, बॉब विलिस ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यातून वगळण्यात आले होते. त्याच्यावर कोरोना प्रोटोकॉल तोडल्याचा आणि चाहत्यांसह फोटो काढल्याचा आरोप आहे. तीन दिवसांपूर्वी ससेक्सविरुद्धच्या पाचव्या प्रथम श्रेणी सामन्यात कॉक्सने सर्वात मोठे शतक ठोकले होते.

डेव्हिड निकोलस (211) चा त्याने 57 वर्षांचा रेकॉर्ड तोडला होता, जो त्याने 1963 मध्ये डर्बशायर विरुद्ध रचला होता. याशिवाय 21 व्या शतकात जन्मलेला तो असा पहिला क्रिकेटपटूही ठरला आहे, ज्याने इंग्लंडच्या भूमीवर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक ठोकले होते.

क्रिकेटचे केंट डायरेक्टर पॉल डॉटन म्हणाले की, “चाहत्यांसह फोटो काढणे कोविड -१९ प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे. त्यामुळे कॉक्सला संघापासून वेगळं करावे लागले. जेव्हा त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येईल तेव्हाच त्याला संघात स्थान देण्यात येईल. हे खरोखर दुर्दैवी आहे की इतक्या चांगल्या कामगिरीनंतरही त्याने मेडिकल प्रोटोकॉल तोडला. आमच्याकडे त्याला आयसोलेशनमध्ये पाठविण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.”

मला माझी चूक लक्षात आली: कॉक्स

कॉक्सनेही आपली चूक कबूल केली आणि म्हटले की,”माझ्यामुळे संघाला त्रास झाला याची मला खंत आहे. मला या परिणामाची माहिती नव्हती. मी प्रत्येकाची माफी मागतो.”

कॉक्स-लिनिंगची 423 धावांची विक्रमी भागीदारी होती

कॉक्सने सहकारी फलंदाज जॅक लिनिंगबरोबर दुसर्‍या विकेटसाठी 423 धावांची नाबाद भागीदारी रचली. ससेक्सच्या 332 धावांच्या प्रत्युत्तरात केंटने पहिल्या डावात 120 षटकांत एक विकेट गमावून 530 धावा केल्या. कॉक्स 238 आणि लिनिंग 220 धावांवर नाबाद होता. कोरोनामुळे लागू झालेल्या नियमांमुळे हे दोघेही यापेक्षा जास्त फलंदाजी करू शकले नाहीत.

नवीन नियमांमुळे कॉक्सला जास्त फलंदाजी करता आली नाही.

नव्या नियमानुसार बॉब विलिस ट्रॉफीमध्ये 96 ऐवजी दररोज 90 षटके खेळली जातात. त्याचबरोबर संघ पहिल्या डावात केवळ 120 षटकात फलंदाजी करू शकतात. या कारणास्तव, कॉक्स-लिननिंगची जोडी पहिल्या डावात 120 षटकांच्या पुढे खेळू शकली नाही.

कोणत्याही विकेटसाठी केंटची सर्वात मोठी भागीदारी

जॉर्डन आणि जॅकची ही भागीदारी ससेक्स विरुद्ध केंटच्या कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी आहे.1889 मध्ये जॉर्ज हर्नी आणि फ्रान्सिस मर्चंटने चौथ्या विकेटसाठी 249 धावांचा रचलेला 131 वर्षांचा विक्रम या दोघांनी मोडला. जॉर्डन आणि जॅकने द्विशतकी खेळी करताना एकूण 56 चौकार ठोकले. जॉर्डनने 27 चौकार आणि तीन षटकार लगावले तर जॅकने 29 चौकार ठोकले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---