---Advertisement---

रिषभ पंतनंतर टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू जखमी; गिल-गंभीरची वाढली चिंता!

On: रविवार, जानेवारी 11, 2026 7:19 PM
---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू रिषभ पंत जखमी झाला होता. सरावादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्याला संघातून बाहेर पडावे लागले. आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना वडोदरा येथील बीसीए स्टेडियम कोटम्बी येथे खेळला जात आहे. या सामन्यादरम्यानही टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू जखमी झाला असून, त्याला मैदानातून बाहेर जावे लागले आहे.

पहिल्या वनडे सामन्यात शुबमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात फिरकीपटू ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली होती. मात्र, सुंदरला सामन्यादरम्यान ‘साइड स्ट्रेन’ची समस्या जाणवली, ज्यामुळे त्याला मैदान सोडून बाहेर जावे लागले. समालोचनाद्वारे असे समजले की सुंदर सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहे. गेल्या काही दिवसांत दुखापत झालेला सुंदर हा तिसरा भारतीय खेळाडू आहे. ऋषभ पंतच्या आधी तिलक वर्मा देखील जखमी झाला होता. विशेष म्हणजे तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर हे भारताच्या टी20 वर्ल्ड कप 2026 च्या स्क्वॉडचा भाग आहेत, त्यामुळे सुंदरच्या दुखापतीमुळे टीम मॅनेजमेंटची चिंता वाढली आहे.

वडोदरा वनडे सामन्यात वॉशिंग्टन सुंदर केवळ 5 षटकेच टाकू शकला. या दरम्यान त्याला एकही विकेट मिळाली नाही आणि त्याने 27 धावा दिल्या. सुंदर मैदानातून बाहेर गेल्यामुळे कर्णधार शुभमन गिलकडे केवळ 5 गोलंदाज उरले होते. न्यूझीलंडच्या संघाने शानदार फलंदाजी करत 50 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 300 धावा केल्या. किवी संघासाठी डॅरिल मिचेल, डेव्हन कॉनवे आणि हेन्री निकोल्स यांनी अर्धशतके झळकावली. भारताकडून मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---