भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. हा सामना या मालिकेतील शेवटचा आहे. आतापर्यंत या दोन्ही संघात तीन सामने खेळले गेले आहेत. या मालिकेत आतापर्यंत बर्याच खेळाडूंना दुखापत झाली आहे. त्याचबरोबर चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा गोलंदाजी करताना दिसून आला. त्यामुळे त्यावर दिनेश कार्तिकने यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.
चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला दुखापत झाली आहे. पहिल्या डावातील नवदीप सैनी 36 वे षटक टाकत असताना त्याच्या पाचव्या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या मार्नस लॅब्यूशानेच्या बॅटची कडा घेवून चेंडू स्लिपमध्ये असलेल्या अजिंक्य रहाणेकडे गेला. रहाणे तो चेंडू पकडू शकला नाही. तेव्हा सैनी पाय पकडून खाली बसला आणि वेदनेने तळमळत होता. त्यानंतर भारतीय फिजियोने येऊन त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर ही त्याला खेळता येत नव्हते. त्यामुळे त्याला मैदानातून बाहेर घेऊन जाण्यात आले. त्यामुळे त्याच्या षटकातील राहिलेला एक चेंडू रोहित शर्माने टाकला आणि त्यावर एक धाव देत षटक पूर्ण केले.
रोहित शर्माने गोलंदाजी केल्यानंतर भारतीय संघाचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने एक ट्विट केले. त्यामध्ये मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना चेतावणी देताना लिहले, “नवीन वेगवान गोलंदाज सहभागी होण्यासाठी तयार आहे.”
@Jaspritbumrah93 and and @MdShami11 better watch out , new fast bowler in the wings @ImRo45 #absolutelyrapid pic.twitter.com/4HoF8zcl9A
— DK (@DineshKarthik) January 15, 2021
मात्र, रोहित शर्मा जास्त गोलंदाजी करताना दिसत नाही. त्याने यापूर्वी 2019 मध्ये शेवटची गोलंदाजी केली होती. रोहित शर्माच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 2 विकेट्सची नोंद आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवस अखेर 87 षटकांत 5 गडी गमावून 274 धावा धावा केल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार फलंदाज डेविड वॉर्नर पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो या सामन्यात फक्त 1(4) धावेवर बाद झाला. मार्क्स हॅरिस 5(23)धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात जरी खराब झाली असली तरी मार्नस लॅब्यूशानेने सर्वाधिक 108 धावांची शतकी खेळी करून ऑस्ट्रेलिया संघाचा डाव सावरला.
त्यांनंतर स्टीव्ह स्मिथने 77 चेंडूचा सामना करताना 36 धावा केल्या. मॅथ्यू वेड याने 87 चेंडूत 45 धावा केल्या. त्याचबरोबर पहिल्या दिवसाचा खेळ संपला संपला तेव्हा कॅमरॉन ग्रीन आणि कर्णधार टीम पेन हे दोघे अनुक्रमे 28 आणि 38 धावांवर खेळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्याला’ ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघात स्थान न दिल्याने माजी दिग्गजाने फटकारले
लॅब्यूशेनने शतकी खेळीने करत केवळ स्मिथलाच नाही तर ‘या’ दिग्गजांनाही टाकले मागे
पुन्हा येरे माझ्या मागल्या! सिडनी पाठोपाठ ब्रिस्बेनमध्येही सिराजबद्दल प्रक्षेकांमधून ऐकू आले अपशब्द