सध्या इंग्लंडचा पाकिस्तान दौरा सुरू आहे. त्यामध्ये पकिस्तान विरूद्ध इंग्लंड (Pakistan vs England) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा दारूण पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसरा कसोटी सामना मुल्तानच्या मैदानावर खेळला जात आहे. तत्पूर्वी पीसीबीच्या निवड समितीने माजी कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) दुसऱ्या कसोटी मालिकेतून वगळले होते. त्याच्या जागी निवड समितीने कामरान गुलामला (Kamran Ghulam) संघात स्थान दिले होते. या खेळाडूने पदार्पण सामन्यात शानदार शतक झळकावले. त्यानंतर त्याने आपल्या कामगिरीबद्दल वक्तव्य केले आहे.
कामरान गुलामचे (Kamran Ghulam) शतक येथील कठीण खेळपट्टीवर आले, त्यामुळे पाकिस्तानने दुस-या कसोटीच्या पहिल्या दिवशी 5 विकेट्स गमावत 259 धावा केल्या. बाबरच्या जागी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या गुलामने 224 चेंडूत 118 धावांची शानदार शतकी खेळी खेळली आणि पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो 13वा पाकिस्तानी फलंदाज ठरला. पण इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला.
सामन्यानंतर गुलाम म्हणाला, “पाकिस्तानसाठी खेळण्याची संधी मिळण्यासाठी जवळपास 4 वर्षे वाट पाहणे माझ्यासाठी निराशाजनक होते. माझ्यात खूप उत्कटता होती आणि जेव्हाही संधी मिळेल तेव्हा चांगली कामगिरी करायची होती. मी धीराने वाट पाहिली कारण मला संधी मिळेल हे माहित होते, मला वाटते की देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक वर्षांपासून कठोर परिश्रम केल्याने मला सर्व प्रकारच्या खेळपट्ट्यांवर आणि सर्व प्रकारच्या गोलंदाजांविरूद्ध खेळण्याचे कौशल्य मिळाले आहे.”
पुढे बोलताना कामरान गुलाम (Kamran Ghulam) म्हणाला, “होय, बाबर आझमच्या जागी खेळणे, म्हणजे माझ्यावर एक प्रकारे दडपण होते. पण मला वाटते की माझ्या यशाच्या इच्छेने ते सर्व दडपण मागे टाकले.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ भारतीय खेळाडूची ऑस्ट्रेलियाला जास्त भीती! ऑस्ट्रेलिया कर्णधाराचे वक्तव्य
IND vs NZ; कसोटी सामन्यापूर्वीच कर्णधाराचे मोठे वक्तव्य! म्हणाला…
जामनगरचा वारस झाला भारताचा ‘हा’ माजी खेळाडू! संपत्तीच्या बाबतीत कोहलीला टाकलं मागे